बचतीसाठीच्या पारंपरीक साधनांच्या तुलनेत अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड (Mutual Funds) एक आकर्षक पर्याय ठरतोय. दीर्घकाळ गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्यासाठी, म्युच्युअल फंडातील SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि (Systematic Investment Plan) चक्रवाढ व्याजाची (Power of Compounding) यांची सांगड घातल्यास गुंतवणूक वेगाने वाढण्यास मदत होते.
( नक्की वाचा: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच )
स्टेप-अप SIP म्हणजे काय?
SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक लोकप्रिय आणि सोपा मार्ग बनला आहे. यातून दरमहा छोटी रक्कम गुंतवून संपत्ती निर्माण करणे शक्य असते. एसआयद्वारे केली जाणारी गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अधिक हवा असेल तर 'स्टेप-अप SIP' (Step-Up SIP) हा पर्याय प्रभावी ठरू शकतो. अनेक गुंतवणूकदार आता 'स्टेप-अप SIP' (Step-Up SIP) चा अवलंब करत असून त्यातून त्यांना चांगला फायदा मिळत असल्याचे सांगितले जाते.
( नक्की वाचा: बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे )
'स्टेप-अप SIP' मध्ये, गुंतवणूकदार एसआयपीद्वारे करत असलेली गुंतवणूक टप्प्याटप्प्याने वाढवत जातात. त्याला चक्रवाढ व्याजाची जोड मिळाल्याने अधिक फायदा मिळतो. शेअर बाजाराशी (Stock Market) संलग्न साधनांमध्ये गुंतवणुकीत जास्त धोका असला तरी, त्यातून मिळणारा परतावा हा चांगला असतो. संयम बाळगला आणि दीर्घकाळाचा दृष्टीकोण ठेवला तर गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळू शकतो. अनेक लोकप्रिय म्युच्युअल फंडनी गुंतवणूकदारांना सरासरी 12-14% वार्षिक परतावा दिला आहे. म्हणूनच, कमी कालावधीत 1 कोटी रुपयांसारख्या मोठ्या निधीचे (Corpus) लक्ष्य गाठणे फारसे अवघड नाही.
10 वर्षांत SIP गुंतवणुकीद्वारे करोडपती कसे बनू शकतो?
आपण धरून चालू की तुम्हाला 10 वर्षांच्या कालावधीत 1 कोटी रुपये गुंतवणुकीतून उभे राहावे असे वाटते आहे, त्यासाठी काय करावे लागेल ते पाहूयात.
सर्वसाधारण SIP योजना
- जर एखाद्या म्युच्युअल फंडाने वार्षिक 12% परतावा दिला, तर तुमची गुंतवणूक खालीलप्रमाणे वाढेल
- SIP रक्कम: 43,500 रुपये
- अंदाजित परतावा: 12%
- गुंतवलेली एकूण रक्कम: 52,20,000 रुपये
- अंदाजित परतावा (मिळालेला): 48,86,749 रुपये
- एकूण मूल्य (10 वर्षांनंतर): 1,01,06,749 रुपये
वरील उदाहरणात, दरमहिना 43,500 रुपये SIP द्वारे गुंतवणे अनेकांना शक्य होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, 'स्टेप-अप SIP' हा एक चांगला पर्याय आहे, ज्यात तुम्ही तुमचे उत्पन्न वाढले की गुंतवणूकही वाढवू शकता.
'स्टेप-अप SIP' योजना
- कालावधी: 10 वर्षे
- SIP रक्कम (सुरुवातीला): 30,000 रुपये
- वार्षिक स्टेप-अप: दरवर्षी गुंतवणूक 10% वाढवावी
- अंदाजित परतावा: 12%
- गुंतवलेली एकूण रक्कम: 57,37,472 रुपये
- अंदाजित परतावा (मिळालेला): 43,85,505 रुपये
- एकूण मूल्य (10 वर्षांनंतर): 1,01,22,978 रुपये
'स्टेप-अप SIP' पर्यायामध्ये सुरुवातीला SIP रक्कम कमी असली तरी, एकूण गुंतवलेली रक्कम जास्त असते. मात्र ही रक्कम सोयीनुसार वाढवत नेल्याने एक मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते. या रकमेवरील 12 टक्क्यांच्या हिशोबाने मिळणारा परतावा गुंतवणुकीच्या रकमेत जोडल्यास 10 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकाल.
( नक्की वाचा:रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा )