Life Insurance च्या तक्रारींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक घट; IRDAI च्या वार्षिक अहवालातून सकारात्मक चित्र समोर

विमा नियामक मंडळ 'आयआरडीएआय'च्या (IRDAI) अहवालानुसार, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ग्राहकस्नेही नियमांमुळे तक्रारींचे प्रमाण निम्म्यावर आले असून विमा क्षेत्रावरील नागरिकांचा विश्वास कमालीचा वाढला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IRDAI Annual Report : विमा नियामक मंडळ 'आयआरडीएआय'च्या (IRDAI) आर्थिक वर्ष 2024 च्या वार्षिक अहवालानुसार, भारतातील जीवन विमा क्षेत्रातील ग्राहकांच्या अनुभवात मोठी सुधारणा झाली आहे. गेल्या 10 वर्षांत विम्यासंदर्भातील तक्रारींमध्ये 50% पेक्षा जास्त घट झाली आहे. तसेच, आर्थिक वर्ष 2025 मध्ये 'विमा भरोसा' पोर्टलवर आलेल्या एकूण तक्रारींपैकी 1% पेक्षाही कमी तक्रारी प्रलंबित होत्या.

हा बदल विमा क्षेत्राची सकारात्मक प्रगती दाखवतो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये चालू पॉलिसींची संख्या 2 कोटी 92 लाखांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच विम्याचा विस्तार वेगाने होत असतानाच, दुसरीकडे गेल्या 10 वर्षांत तक्रारींची संख्या 2.79 लाखांवरून थेट 1.23 लाखांपर्यंत खाली आली आहे.

Advertisement

काय बदल होणार?

दर 10 हजार पॉलिसींमागे होणाऱ्या तक्रारी: आर्थिक वर्ष 2015 मधील 108 तक्रारींवरून घटून आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे प्रमाण फक्त 42 तक्रारींवर आले आहे. तक्रारींचे गुणोत्तर याच काळात हे प्रमाण 1.08% वरून कमी होऊन 0.42% झाले आहे.

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)

सुधारणेची मुख्य कारणे

तंत्रज्ञानाचा वापर, उत्तम व्यवस्थापन आणि ग्राहकाभिमुख नियमांमुळे हा मोठा बदल झाला आहे. डिजिटल पद्धतीने ग्राहकांना जोडणे, ई-केवायसी, आधार पडताळणी आणि तत्काळ तपासणी (रिअल-टाइम व्हॅलिडेशन) यामुळे सुरुवातीला होणाऱ्या चुका थांबल्या आहेत. तसेच, एआय (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे आणि चोख देखरेखीमुळे विम्याच्या विक्रीची गुणवत्ता सुधारली आहे व वाद कमी झाले आहेत.

नवे नियम आणि वेगवान सेवा

पॉलिसीधारकांच्या हितासाठी (PPHI) घेतलेल्या नियमांमुळे सेवा अधिक वेगवान झाली आहे. दावा निकालात काढण्याचा काळ 30 दिवसांवरून आता 15 दिवस करण्यात आला आहे. तपासाचा काळ 90 दिवसांवरून कमी करून 45 दिवस करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)

विमा क्षेत्र आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. आज भारताच्या एकूण विमा व्यवसायात 80% पेक्षा जास्त वाटा एकट्या जीवन विम्याचा आहे, जे लोकांच्या आर्थिक सुरक्षेतील त्याचे महत्त्व दाखवते. तसेच, सरकारी रोख्यांमध्ये (Securities) या क्षेत्राची 24.37 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यात हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Advertisement

'2047 पर्यंत सर्वांसाठी विमा' हे देशाचे ध्येय असून, चांगल्या कारभाराद्वारे, जलद सेवेद्वारे आणि ग्राहकांशी उत्तम संवाद साधून लोकांचा विश्वास आणखी वाढवण्यावर सध्या भर दिला जात आहे.
 

Topics mentioned in this article