Hero MotoCorp Flex Fuel Bikes (HF Deluxe & Splendor Plus): मध्यमवर्गीयांची पहिली पसंती आणि मायलेज किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरो मोटोकॉर्पच्या Hero Splendor Plus आणि Hero HF Deluxe या दोन लोकप्रिय बाईक्स आता पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणाऱ्या नव्या अवतारात बाजारात येत आहेत. 3 जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या फ्लेक्स-फ्यूल (E85) बाईक्सचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर 5 जून रोजी पेट्रोलियम मंत्र्यांच्या उपस्थितीत इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेटवर विशेष E85 इंधन (Flex-Fuel) देखील लाँच करण्यात आले, जे सुरुवातीला देशातील 500 पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांचे नेमके किती पैसे वाचतील?
फ्लेक्स-फ्यूल बाईक्स खरेदी केल्यानंतर नेमकी बचत कशी होणार, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या दिल्लीत नियमित पेट्रोलचा दर 102 रुपये प्रति लीटर आहे, तर नव्याने लाँच झालेल्या E85 इंधनाची किंमत अवघी 82 रुपये प्रति लीटर असणार आहे. म्हणजेच थेट 20 रुपये प्रति लीटरची मोठी बचत ग्राहकांना मिळणार आहे. या E85 इंधनामध्ये 15% पेट्रोल आणि 85% इथेनॉलचे मिश्रण असते. इथेनॉलच्या वापरामुळे बाईकच्या मायलेजमध्ये 7 ते 10 टक्के घट होण्याची शक्यता असली, तरी कमी किमतीमुळे ग्राहकांचा एकूण खर्च कमीच होणार आहे.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

रोज 50 किलोमीटर चालणाऱ्यांची किती बचत होणार?
Hero HF Deluxe चे गणित
पेट्रोल व्हर्जन (मायलेज 70 किमी/लीटर): रोजचा खर्च 72.82 रुपये
- फ्लेक्स-फ्यूल व्हर्जन (अंदाजे मायलेज 65 किमी/लीटर): रोजचा खर्च 63.05 रुपये
- रोजची बचत: 9.77 रुपये
- महिन्याची बचत (26 दिवस): 254 रुपये
- वर्षाची एकूण बचत (313 दिवस): 3,058 रुपये
Hero Splendor Plus चे गणित
- पेट्रोल व्हर्जन (मायलेज 65 किमी/लीटर): रोजचा खर्च 78.43 रुपये
- फ्लेक्स-फ्यूल व्हर्जन (अंदाजे मायलेज 62 किमी/लीटर): रोजचा खर्च 66.09 रुपये
- रोजची बचत: 12.34 रुपये
- महिन्याची बचत (26 दिवस): 321 रुपये
- वर्षाची एकूण बचत (313 दिवस): 3862 रुपये
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)

फ्लेक्स-फ्यूल बाईक खरेदी करणे फायद्याचे ठरेल का?
ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हिरोच्या या फ्लेक्स-फ्यूल बाईक्स जुलै 2026 पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. सुरुवातीला या मॉडेल्सची एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमत नियमित पेट्रोल मॉडेल्सपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.
ज्या लोकांचे दैनंदिन फिरणे कमी आहे, त्यांना सुरुवातीला ही बचत मर्यादित वाटू शकते. परंतु, रोज 50 किमी किंवा त्याहून अधिक प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक आणि विशेषतः डिलिव्हरी पार्टनर्स यांच्यासाठी या बाईक्स 'गेम-चेंजर' ठरतील. वर्षाला 3000 ते 3800 रुपयांच्या थेट आर्थिक बचतीसोबतच, इथेनॉलच्या वापरामुळे हवेचे प्रदषणही कमालीचे कमी होणार असल्याने हा सौदा नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world