कोटक महिंद्रा बँकेवर का केली कारवाई, 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडणे आणि नव्या क्रेडिट कार्डचं वितरण करण्यावर निर्बंध आणले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:
  1. माहिती सुरक्षा ऑपरेशन्स आणि आयटी यंत्रणेतील जोखीम व्यवस्थापनातील कमतरतेमुळे आरबीआयकडून कारवाई करण्यात आली. 
  2.  आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेतील आयटी यंत्रणेत कमतरता आढळली होती. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणात बँकेकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. मात्र आरबीआयला बँकेकडून आलेलं स्पष्टीकरण समाधानकारक वाटलं नाही. 
  3.  रिझर्व्ह बँकेने 2022 आणि 2023 मध्ये केलेल्या आयटी यंत्रणेच्या तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. 
  4. कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी इन्वेंट्री  व्यवस्थापन आणि डेटा सुरक्षिततेत गंभीर त्रुटी आढळल्याचं आरबीआयने सांगितलं. 
  5.  बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या सेक्शन   35 A अंतर्गत आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आणि कोटक महिंद्रा बँकेविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत बँकेसोबत जोडले गेलेल्या बँकेच्या ग्राहकांना सर्व सेवांचा लाभ घेता येईल.
  6. कोटक महिंद्रा बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 49 लाखांहून अधिक क्रेडिट कार्डाचा वापर केला जात आहे. 
  7.  बँकेचे 28 लाखांहून अधिक डेबिट कार्ड सक्रिय आहेत. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, देशभरात 1780 हून जास्त ब्रांन्च आहेत आणि 2023 पर्यंत एकूण 4.12 कोटी ग्राहक आहेत. 
  8. कोटक महिंद्रा बँकेत एकूण 1 लाखांहून अधिक कर्मचारी करीत आहेत. याशिवाय सध्या बँकेत एकूण 3.61 लाख कोटी रूपये जमा आहे. 
  9.  कोटक महिंद्रा फायनान्सला 2003 साली बँकिंग परवाना मिळाला होता आणि NBFC मधून बँकेत रुपांतरित होणारी ही पहिली युनिट होती. 
  10. कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड बिझनेसबद्दल सांगायचं झालं तर भारतीय मार्केटमध्ये तब्बल 4 टक्के भागीदारी आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात क्रेडिट कार्डची भागीदारी 3.8 टक्के इतकी आहे.