Life Insurance 7 Myths: व्यक्तीला जीवनातील प्रत्येक टप्प्यामध्ये एक गोष्ट कायम भेडसावत असते, ती म्हणजे दीर्घकाळापर्यंत आर्थिक सुरक्षिततेची गरज. जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो भविष्यातील आपली आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करतो. पण अनेक गैरसमजांमुळे जीवन विमा पॉलिसी लवकर खरेदी करण्यास विलंब होतो. परिणामी भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 83 टक्के व्यक्तींनी अजूनही जीवन विमा घेतलेला नाही. त्यामुळे 17 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त जीवन विमा संरक्षण तफावत निर्माण झाली आहे (स्विस रे, 2023), जी जगामध्ये सर्वाधिक आहे. या आकडेवारीमधून कव्हरेजमधील तफावत दिसून येते तसेच लाखो व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा दिसून येतात. ज्या संरक्षणामधील तफावतीमुळे अपूर्ण राहण्याचा धोका आहे. यासंदर्भात आम्ही जीवन विम्याबाबत असलेल्या सर्वात सामान्य मिथकांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे लोक अधिक स्पष्टतेसह आणि आत्मविश्वासाने जीवन विमा स्वीकारू शकतील. इन्शुरन्स अवेअरनेस कमिटी (आयएसी-लाइफ)चे सदस्य ऋषभ गांधी आणि इन्श्युरन्स अवेअरनेस कमिटी (आयएसी-लाइफ)चे सदस्य पराग राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवनविम्याविषयी सात प्रमुख गैरसमज आहेत.
पहिला गैरसमज : जीवन विमा गुंतागुंतीचा आहे
सर्वात पहिली बाब म्हणजे व्यक्ती कोणत्याही पॉलिसी घेताना त्यांची वैयक्तिक किंवा वैद्यकीय तपशीलांची माहिती देण्यास घाबरतात किंवा टाळाटाळ करतात. पण जीवन विम्याचे मूळ तत्त्व सोपे आहे - नियमित, नियतकालिक प्रीमियम भरण्याच्या बदल्यात पॉलिसीधारकाचे दुर्दैवाने निधन झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. हे संरक्षण पहिल्या दिवसापासून सुरू होते, त्यासाठी वाट पाहावी लागत नाही आणि प्रक्रियेमध्ये कोणतीही अस्पष्टता नसते. आजकाल, डिजिटल प्लॅटफॉर्म, अॅप्स, वेबसाइट्स, सोपे इंटरफेस आणि AIमुळे साधने सहजपणे उपलब्ध असल्याने पॉलिसीबाबत सहजपणे आणि सविस्तरपणे माहिती मिळते तसेच पॉलिसीचे सहजपणे व्यवस्थापन करता येते.
दुसरा गैरसमज: टर्म प्लॅन पुरेसा नाही
मुदत योजना जीवन विम्यासाठी किफायतशीर पैलू आहे. पण ही योजना नेहमी पुरेशी ठरत नाही. ही योजना जोखीमविरोधात संरक्षण देत असली तरी अनेक व्यक्तींना दीर्घकालीन बचत पर्याय, निवृत्ती नियोजन आणि मालमत्ता जतन करणाऱ्या साधनांची आवश्यकता असते. जीवन विमा हे आर्थिक संरक्षण साधन आहे, जे तुम्हाला मुलांचे शिक्षण, त्यांचा विवाह किंवा तुमच्या निवृत्तीनंतरच्या गरजा अशा जीवनातील विविध टप्प्यांचे व्यवस्थापन करण्यास धोरणात्मक आर्थिक स्थिरता देते.
तिसरा गैरसमज: जीवन विमा खरेदी करणे माझ्यासाठी फायदेशीर नाही, मग जीवन विमा का करायचा?
जीवन विम्याबद्दल हा सर्वात गैरसमज आहे. जीवन विमा कधीही त्वरित समाधान देत नाही, तर तुमच्या आणि प्रियजनांच्या स्वप्नांना तसेच महत्त्वाकांक्षांना सुरक्षित करतो. हे एक बीज लावण्यासारखे आहे, जे झाडाप्रमाणे वाढते तेव्हा भावी पिढ्यांना संरक्षण मिळते. जीवन विमा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देते. अनेक जीवन विमा उत्पादने गंभीर आजार किंवा अपंगत्वाच्या बाबतीत जगण्याचे फायदे देखील देतात, ज्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक देयके सुरक्षित करता येतात. जीवन विमा व्यासपीठासारखे आहे, जेथे विमा कंपनी संरक्षण देण्यासोबत विमाधारकाच्या वैयक्तिक ध्येयांची पूर्तता करू शकते.
चौथा गैरसमज: जीवन विमा फक्त कर बचतीसाठी आहे
जीवन विम्याबाबत सर्वात मोठा गैरसमज म्हणजे जीवन विमा फक्त कर बचतीचे साधन आहे. आयकर कायद्याच्या कलम 80सी आणि 10(10डी)नुसार प्रीमियम आणि देयकांवर फायदे दिले जातात, पण जीवन विम्याचा खरा उद्देश त्यापलिकडे आहे. कर बचत फक्त अतिरिक्त फायदा आहे. गुंतवणूकीच्या निर्णयावर परिणाम करणारे मूलभूत घटक सुरक्षा आहे मी, भविष्यातील कर्ज समस्या, सेवानिवृत्ती योजना, दीर्घकालीन योजना, महत्त्वाकांक्षा, रिस्क कव्हर, बचत आणि कुटुंब कल्याण असू शकतात.
पाचवा गैरसमज: जीवन विमा म्हणजे आयुष्यभर प्रीमियम भरणेहा सर्वात प्रचलित गैरसमज आहे. सर्व जीवन विमा पॉलिसीमध्ये ताहयात प्रीमियम भरण्याची आवश्यकता नसते. अनेक विमा योजना प्रीमियम पेमेंट अटींमध्ये स्थैर्य देतात. मर्यादित-देय पॉलिसी, सिंगल-प्रीमियम योजना आणि अल्प-मुदतीचा विमा ही त्याची काही उदाहरणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जितक्या लहान वयात जीवन विमा काढला जाईल, तेवढा प्रीमियम कमी आणि उत्पन्नाचा स्रोत अचानक थांबल्यास आर्थिक संरक्षण मिळते.
IRDAI नुसार, आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारतीय जीवन विमा कंपन्यांकडे दाखल केलेल्या जीवन विमा पॉलिसी क्लेम्सपैकी 96.82 टक्के क्लेम्स 30दिवसांच्या आत निकाली काढण्यात आले. हा कालावधी कोविड-19 साथीच्या आजाराच्या परिणामांशी जुळणारा होता आणि जीवन विमा कंपन्यांनी सर्व वैध क्लेम्स त्वरित निकाली काढले. यामधून गेल्या काही वर्षांत विमा कंपन्यांमध्ये आलेली स्थिरता दिसून येते. नियामकांनी केलेल्या सुधारणांमुळे क्लेम प्रक्रिया देखील सुव्यवस्थित झाली आहे, ज्यामुळे तपास प्रकरणांसाठी निकाली काढण्याचा कालावधी 90 दिवसांवरून फक्त 45 दिवसांवर आला आहे. वैयक्तिक डिवाईसेसवरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून बहुतेक क्लेम्स डिजिटल माध्यमातून केले जाऊ शकतात. कागदपत्रांची पूर्व-मंजूर यादी नामांकित व्यक्तींना प्रक्रिया जलद पूर्ण करण्याची सुविधा देते.
(नक्की वाचा: Tata Group News : पुण्याच्या किर्लोस्करांचा जावई होणार रतन टाटांचा उत्तराधिकारी? TATA घराण्यात मोठा फेरबदल)
सातवा गैरसमज : अविवाहित पुरुष असो किंवा महिला, तरूण प्रौढ वयोगटातील व्यक्तींना जीवन विम्याची आवश्यकता नाहीतुम्ही कार किंवा घर यासारखी प्रत्यक्ष मालमत्ता खरेदी केल्यानंतर तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी त्याचा विमा काढता. त्याचप्रमाणे कमाई करू लागताच तरूण व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण केले पाहिजे. आज तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती नसल्या तरी लवकर जीवन विमा खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यात कमी प्रीमियम आणि चांगल्या आरोग्य निर्देशांकांमुळे उत्तम कव्हरेज मिळते. लवकर सुरुवात केल्याने दीर्घकालीन बचत वाढवण्यास देखील मदत होते. लवकर सुरुवात केल्याने तरुण दुर्दैवानं मृत्यू पावला तर व्यक्तीचे कर्ज उदाहरणार्थ विद्यार्थी कर्ज, कोणत्याही व्यत्ययाशिवाय फेडले जाते. अचानक उत्पन्नामध्ये होणाऱ्या कपातीचा कुटुंबातील सदस्यांवर भार पडत नाही.
त्यामुळे जीवन विमा ओझे नाही तर जबाबदार आर्थिक नियोजनाचा पाया आहे. तुमच्या आर्थिक प्रवासात जीवन विम्याबाबत फक्त विचार न करता गरज म्हणून प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)