TATA Group : रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात वाद, बदल आणि फेरबदल होताना दिसत आहे. नोएल टाटा यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर टाटा समूहात गटबाजीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. रतन टाटा (Ratan Tata's successor) यांनी समूह आणि ट्रस्टमधून कुटुंबाला दूर ठेवलं. तर दुसरीकडे नोएल टाटा आल्यानंतर त्यांनी ट्रस्ट आणि टाटाच्या कुटुंबाची भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न केला. नोएल रतन टाटाच्या निकटवर्तीयांना बोर्ड आणि ट्रस्टहून दूर करीत आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहेत नोएल यांनी आता टाटा ग्रुपच्या सर्वात प्रभावी ट्रस्टपैकी एक सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये आपला मुलगा नेविल टाटाला प्रवेश करून दिला आहे. नोएल टाटांनी आपला मुलगा नेविल टाटांना सर दोराबजी टाटा ट्रस्टचा महत्त्वाचा भाग दिला आहे. नोएल टाटा हे पुढची पिढी तयार करीत असल्याचं म्हटलं जात आहे. मुलाला जबाबदार बनविण्याबरोबरच 'नोएल गटा'ला मजबूत करण्याचाही प्रयत्न आहे. ट्रस्टमध्ये नेविलची एन्ट्री अशा वेळी झाली आहे, जेव्हा रतन टाटांचे निकटवर्तीय मेहल मिस्त्रीला ट्रस्टच्या बाहेर करण्यात आलं. यांच्याकडे ट्रस्ट टाटा सन्स २७.९८ टक्के भागीदारी आहे आणि ते ग्रुपचे सर्वात मोठा शेअर होल्डर आहेत. विशेष म्हणजे नेविल यांचा मराठीतील प्रसिद्ध उद्योगपती किर्लोस्करांशी खास संबंध आहे.
रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केली. पहिली पत्नी सुनी टाटा आणि दुसरी सिमाने टाटा. त्यापैकी रतन टाटा आणि जिम्मी टाटा ही सुनी टाटा यांची मुलं, तर नोएल टाटा हे सिमोने टाटा यांचा मुलगा. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. नोविल, माया आणि लिआह टाटा. रतन टाटा आणि जिम्मी टाटा यांनी लग्न केलं नाही आणि त्यांना मुलंही नाहीत.

(नेविल टाटा)
कोण आहे नेविल टाटा? l Who is Neville Tata?
रतन टाटा कधीही कुटुंबातील सदस्यांकडे कंपनीची सत्ता देऊ इच्छित नव्हते. ट्रस्ट मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी कुटुंबाला या ट्रस्टमध्ये पूर्णपणे सामील करून घेतलं नाही. दुसरीकडे नोएल टाटा यांनी तिन्ही मुलांकडे कंपनीत वेगवेगळी जबाबदारी दिली, आता नोएल टाटा आपला मुलगा नेविल टाटा यांना ट्रस्टमध्ये सामील करून घेत आहेत. त्यामुळे टाटा ट्रस्टमध्ये सत्ता आपल्या बाजूला झुकलेला राहील आणि मुलाला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करता येईल हा त्यांचा हेतू असावा.
नक्की वाचा - रतन टाटांच्या 10 हजार कोटींच्या संपत्तीतील शंतनू नायडूला काय मिळालं? प्रिय टीटोलाही विसरले नाही!
नोविल टाटा हे नोएल टाटांचे मुलगे आहेत. नेविल टाटा सध्या टाटा ग्रुपच्या रिटेल सुपरमार्केट चैम स्टार बाजारची जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय फास्ट फॅशन ब्रँड जूडियोच्या मागे नेविल यांचा हात आहे. ३२ वर्षीय नेविल टाटांनी बेयर बिझनेस स्कूलमधील पदवी घेतली. २०१६ मध्ये त्यांनी टाटाच्या ट्रेंड लिमिटेडपासून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी जूडियो, स्टार बाजारची जबाबदारी सोपवली गेली. नेविल आणि त्यांची बहीण माया आणि लिया वैयक्तिक आयुष्यात अत्यंत लो-प्रोफाइल राहतात. झी न्यूज हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
किर्लोस्कर कुटुंबाशी खास नातं...l Special relationship with the Kirloskar family
नेविल यांचं लग्न २०१९ मध्ये मानसी किर्लोस्करसोबत झालं. मानसी ही १३,४८८ कोटींच्या किर्लोस्कर मोटर्सची उत्तराधिकारी आहे. मानसी विक्रम किर्लोस्कर आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. किर्लोस्कर कुटुंब पुण्यात राहणारं असून त्यांनी टोयोटा मोटर्सला भारतात आणण्याचं काम केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world