भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या इस्टेटीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोढांची दोन्ही मुलं अभिनंदन लोढा आणि अभिषेक लोढा आमने-सामने आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
या दोन्ही भावांमध्ये लोढा नाव वापरण्यावरुन वाद सुरू होता. धाकट्या भावाने लोढा हे नाव वापरू नये यासाठी अभिषेक लोढा याने उच्च न्यायालय गाठलं आहे. याशिवाय अभिषेक लोढा यांनी अभिनंदन लोढाकडे पाच हजार कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतातील एका बड्या उद्योग कंपनीला तडे गेल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - Torres Company : टोरेस प्रकरणात भारतीयांचे 200 कोटी परदेशात पाठवले? 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी
काय आहे प्रकरण?
बीएसई-लिस्टेड रिॲल्टी फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे सीईओ अभिषेक लोढा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये त्यांनी त्यांचा लहान भाऊ अभिनंदन लोढा याला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोढा समूहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापरासंदर्भात 2015 मध्ये करार करण्यात आला होता. या करारानुसार 2015 नंतर अभिनंदन लोढा लोढा समूहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर अभिनंदन लोढा यांची कंपनी 'कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' नावाने काम करेल असं ठरविण्यात आलं होतं.
लोढांची एकूण संपत्ती किती?
विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार, मंगल प्रभाग लोढा यांच्याजवळ एकूण 447 कोटींची संपत्ती आहे. तर 2019 मध्ये हिच संपत्ती 441.65 कोटी इतकी होती. त्यांच्याकडे 218 कोटींची अचल संपत्ती आणि २२८ कोटींची चल संपत्ती आहे. लोढा यांनी 1980 मध्ये मुंबईत डेव्हलपर लोढा ग्रुपची स्थापना केली. जे आका Macrotech Developers नावाने ओळखलं जातं.