MP Global Investors Summit 2025 : अदाणी समूहाकडून (Adani Group) मध्य प्रदेशात पायाभूत सुविधांपासून ते इतर क्षेत्रांत 1.1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. अदाणी समूह पंप स्टोरेज, सिमेंट, खाणकाम, स्मार्ट मीटर आणि औष्णिक ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये 2030 पर्यंत 1.20 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-2025 च्या निमित्ताने एका व्हिडिओ संदेशात अदाणी समूहाचे चेअरमन अध्यक्ष गौतम अदाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी याबाबत घोषणा केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भोपाळमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ही परिषद मध्य प्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. 24-25 फेब्रुवारी या दोन दिवसीय परिषदेदरम्यान अदाणी समूहाने 1 लाख 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, या गुंतवणुकीतून 2030 पर्यंत एक लाख 20 हजार लोकांना रोजगार मिळू शकेल. आपल्या व्हिडिओ संदेशात गौतम अदाणी पुढे म्हणाले, येत्या काळात सरकारसह बोलणी केल्यानंतर स्मार्ट सिटी, एअरपोर्ट आदी क्षेत्रात एक लाख कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहोत. ही केवळ गुंतवणूकच नाही तर मध्य प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड सिद्ध होईल. या गुंतवणुकीमुळे मध्य प्रदेशाला देश आणि जगभरातील क्षेत्रात आघाडी मिळवून देईल.
नक्की वाचा - Adani Group : अदाणी समूहाकडून 58,104 कोटी रुपयांचं टॅक्स योगदान, ट्रान्सपरन्सी रिपोर्ट आला समोर
19 नीतींचा शुभारंभ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी MP Global Investors Summit 2025 दरम्यान मध्य प्रदेशातील 19 नव्या नीतींचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, विकसित मध्य प्रदेशातून विकसित भारताच्या यात्रेसाठी आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या भव्य आयोजनासाठी मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो.