तुम्ही इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांनी (IMPS) आयएमपीएसवरुन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करणाऱ्या बँकांच्या ग्राहकांना निश्चित मर्यादेनुसार शुल्क भरावे वागणार आहे. आतापर्यंत बँकांकडून ही सुविधा मोफत होती. त्य़ामुळे देशभरातील SBI, HDFC, PNB आणि कॅनरा बँकांच्या ग्राहकांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
15 ऑगस्ट 2025 पासून नवे दर लागू झाले आहेत
SBIचे नवे शुल्क
25,000 रुपयांपर्यंत - शुल्क नाही
25,000 ते 1 लाखांपर्यंत – 2 रुपये + जीएसटी
1 लाख ते 2 लाखांपर्यंत – 6 रुपये + जीएसटी
2 लाख ते 5 लाखांपर्यंत – 10 रुपये + जीएसटी
कॅनरा बँकेचे नवे शुल्क
1 हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क नाही.
1000 ते 10 हजारांपर्यंत - 3 रुपये + जीएसटी
10,000 ते 25 हजार - 5 + जीएसटी
25,000 ते 1 लाखांपर्यंत - 8 रुपये + GST
1,00,000 - 2 लाखांपर्यंत - 15 रुपये + GSTर 2,00,000 - 4 लाकांपर्यंत - 20 रुपये + GST
पंजाब नॅशनल बँक
1,000 रुपयांपर्यंत - कोणतेही शुल्क नाही.
1,001 ते 1 लाखांपर्यंत - ब्राँन्च: ६ रुपये + जीएसटी, ऑनलाइन: 5 रुपये + जीएसटी
1,00,000 पेक्षा जास्त: ब्राँन्चमधून: 12 रुपये + जीएसटी, ऑनलाइन: 10 रुपये + जीएसटी
एचडीएफसी बँकेचे नवीन शुल्क (1 ऑगस्ट 2025 पासून लागू)
1,000 रुपयांपर्यंत: सामान्य ग्राहक: 2.50 रुपये, ज्येष्ठ नागरिक: 2.25 रुपये
1,000 ते 1 लाखांपर्यंत : सामान्य ग्राहक: 5 रुपये, ज्येष्ठ नागरिक: 4.50 रुपये
1 लाखांपेक्षा जास्त: सामान्य ग्राहक: 15 रुपये, ज्येष्ठ नागरिक: 13.50 रुपये
एचडीएफसी बँक गोल्ड आणि प्लॅटिनम खातेधारकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
IMPS काय असतं?
इमीडिएट पेमेंट सर्विस यांनी आयमपीएस एक रियल टाइम पेमेंट सर्व्हिस आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. हे नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑपरेट करतं. या सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही वेळे तातडीने पैसे पाठवू शकतात.