जाहिरात

New Income Tax Bill : कसं असेल नवं कर विधेयक? तुम्हाला फायदा काय होणार? वाचा महत्त्वाची वैशिष्ट्ये

New Income Tax Bill 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025-26) सादर करताना याबाबतची घोषणा केली होती.

New Income Tax Bill : कसं असेल नवं कर विधेयक? तुम्हाला फायदा काय होणार? वाचा महत्त्वाची वैशिष्ट्ये
New Income Tax News : सामान्य करदात्यांनाही समजेल अशी या विधेयकाची भाषा असावी असा मोदी सरकारचा भर आहे. 
मुंबई:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025-26) सादर करताना नवे आयकर विधेयक (New Income Tax Bill) सादर करणार असल्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार नवे आयकर विधेयक गुरुवारी (13 फेब्रुवारी) संसदेत सादर केलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा दशक जुन्या कर विधेयकाची हे विधेयक जागा घेईल. या विधेयकामध्ये कोणत्या खास गोष्टी असतील? त्याचा करदात्यांना काय फायदा मिळणार आहे? ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसं असेल नवं कर विधेयक?

नवे विधेयक 6 वर्ष जुन्या आयकर अधिनियम 1961 ची जागा घेईल. या विधेयकात वेळोवेळी संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे हे अधिक जटील बनले होते. सामान्य करदात्यांनाही समजेल अशी या विधेयकाची भाषा असावी असा मोदी सरकारचा भर आहे. 

या विधयेकात करदात्यांसाठी टॅक्स इयर (Tax Year) ही नवी संकल्पना असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी आपण आर्थिक वर्ष किंवा मुल्यांकन वर्षाच्या आधारे कर भरत असू. आता करदात्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी एकच टॅक्स इयर ही संकल्पना या विधेयकात मांडण्यात येणार आहे.

2020 मध्ये नवीन कर प्रणाली लागू झाली. त्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षात काही बदल झाले आहेत. या बजेटमध्येही या प्रणातील कर रचनेतील टप्पे बदलण्यात आले आहेत. या विषयावर एक खास प्रकरण या बिलमध्ये असू शकतं. 

जुन्या इन्कम टॅक्स बिलमध्ये अनेक विभाग तसंच उपविभाग आहेत. त्यामुळे करदात्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होतात, तसंच काही वेळा वादाची परिस्थिती निर्माण होते. त्याचे रुपांतर एका प्रकरणात होऊ शकते. त्यामुळे हे विधेयकात 536 कलमं, 16 परिशिष्ट और 600 पानं असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीच्या विधेयकात 1200 पानं आहेत. 

याचाच अर्थ नव्या विधेयकात पानांची संख्या निम्यानं कमी करण्यात येणार आहे. कर कायदा सोपा आणि सुटसूटीत करण्याचा सरकारचा फोकस यामध्ये स्पष्ट होतो. 

कामाची बातमी : Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कर्ज माफ होतं का?

( नक्की वाचा : कामाची बातमी : Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कर्ज माफ होतं का? )

काय आहे कर सनद?

कालबाह्य कायदे रद्द करुन तसंच कायद्यामधील भाषा सोपी करुन करदात्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या कायद्यातून केला जाऊ शकतो. कर सनद (टॅक्स चार्टर) पहिल्यांदाच विधेयकात समाविष्ट केली जाऊ शकते. त्यामध्ये करदात्यांच्या हक्कांची स्पष्ट माहिती असेल. तसंच इन्कम टॅक्स विभाग तुमची कशा प्रकारे मदत करेल याची माहिती देखील यामध्ये दिली जाईल. 

कधी होणार अंमलबजावणी?

या विधेयकाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल अशी शक्यता आहे. त्या पद्धतीची शिफारस करण्यात येईल. स्थायी समिती तसंच संबंधित अन्य व्यक्तींच्या सूचना येण्यास वेळ लागू शकतो, ते लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Ratan Tata Will : कोण आहेत मोहिनी दत्ता? ज्यांना रतन टाटांनी  दिली 500 कोटींची संपत्ती !

( नक्की वाचा :  Ratan Tata Will : कोण आहेत मोहिनी दत्ता? ज्यांना रतन टाटांनी दिली 500 कोटींची संपत्ती ! )

सध्याच्या कायद्यात सुधारणा होणार की जुन्या विधेयकाची जागा नवे विधेयक घेणार याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण विधेयक नवे असेल. हे विधेयक 'इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 2025' या नावानं ओळखला जाईल. यापूर्वी हे विधेयक  इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 या नावानं ओळखलं जात असे.  अर्थात यामध्ये व्यापक बदल तुम्हाला फार पाहायला मिळणार नाहीत. कर कायद्यामधील सुसूत्रीकरण यामध्ये अपेक्षित आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: