बिल्डरने दिलेल्या पार्किंगमध्ये कार मावेना, काय कराल? घरमालकाकडे काही अधिकार असतात का?

Parking Dispute: घर खरेदी करताना पार्किंगच्या जागेचा आकार नीट न तपासण्यासारखी लहानशी चूकही नंतर मोठी डोकेदुखी ठरू शकते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Parking Dispute
file photo

Parking Dispute : कोणत्याही अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी पार्किंगची सुविधा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र घर खरेदी करताना पार्किंगच्या जागेचा आकार नीट न तपासण्यासारखी लहानशी चूकही नंतर मोठी डोकेदुखी ठरू शकते. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील मोहाली येथील एका घर खरेदीदारासोबत घडला आहे. त्याला पार्किंगची जागा तर मिळाली, पण ती इतकी लहान होती की त्याची कार तिथे नीट उभीच राहू शकत नव्हती. इतकच नाही तर, हे पार्किंग त्याच्या अपार्टमेंट ब्लॉकपासून तब्बल १५० मीटर दूर होतं. ज्यामुळे त्याला रोज मोठा त्रास सहन करावा लागत होता. जर एखाद्या बिल्डरने तुम्हालाही अशीच लहान पार्किंग दिली, तर तुम्हाला तुमचे कायदेशीर अधिकार माहीत असणं गरजेचं आहे.

या प्रकरणात घर खरेदीदाराने पंजाब रेराकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्याचं म्हणणं होतं की, त्याला दिलेली पार्किंगची जागा ही नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांचं उल्लंघन करणारी आहे. आपल्या तक्रारीत त्याने NBC च्या नियमांचा दाखला दिला, ज्यामध्ये पार्किंगसाठी किमान आकार निश्चित करण्यात आला आहे. परंतु, त्याला मिळालेल्या पार्किंगचा आकार अवघा २.२ मीटर x ४.१ मीटर होता, जो खूपच लहान होता. इतक्या कमी जागेत तो आपली गाडी नीट पार्क करू शकत नव्हता.

Advertisement


नॅशनल बिल्डिंग कोडचे नियम काय सांगतात?

  • एका कारसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा किमान ३ मीटर x ६ मीटर असावी.
  • कॉमन कार पार्किंगसाठी किमान २.७५ मीटर x ५ मीटर जागा आवश्यक आहे.
  • स्कूटर/दोन चाकी वाहनांसाठी किमान १.२५ चौरस मीटर जागा असावी.
  • सायकलसाठी किमान १.०० चौरस मीटर जागा असणे गरजेचे आहे.


रेराचं म्हणणं काय आहे?

या प्रकरणात रेरा प्राधिकरणाने स्पष्ट केलं की, रेरा कायद्यात पार्किंगच्या जागेचा किमान आकार किती असावा, याबद्दल कुठेही स्पष्ट नियम किंवा तरतूद नाही. याच कारणामुळे घर खरेदीदार हा खटला जिंकू शकला नाही. रेराने स्पष्ट केलं की, या कायद्यांतर्गत ते बिल्डरला गेस्ट किंवा EWS साठी ५% पार्किंग आरक्षित ठेवण्यास सर्व फ्लॅट मालकांना समान आकाराची पार्किंग देण्यास किंवा पार्किंगची कोणतीही निश्चित लांबी-रुंदी ठरवण्यास सांगू शकत नाहीत.

नक्की वाचा - Gold Sliver Price Hike : सोनं-चांदीच्या दरात बंपर वाढ; अवघ्या एकाच दिवसात वाढलेले दर पाहून धक्काच बसेल!

घर खरेदीदार बिल्डरला NBC चे नियम पाळण्यास भाग पाडू शकतो का?

या प्रकरणात बिल्डरच्या वकिलांच्या मते, नॅशनल बिल्डिंग कोडचे नियम बंधनकारक नसतात. कायदेशीर तज्ज्ञांनुसार, NBC हा स्वतःमध्ये कोणताही कडक कायदा नाही, तर ती एक मार्गदर्शिका आहे. NBC चे नियम तेव्हाच लागू होतात, जेव्हा स्थानिक महानगरपालिका  किंवा विकास प्राधिकरण त्यांचा समावेश आपल्या बांधकाम नियमावलीत करतात किंवा प्रकल्पाला मंजुरी देताना या अटी लागू करतात. म्हणजेच, जर स्थानिक नियमांमध्ये NBC च्या तरतुदींचा समावेश नसेल, तर बिल्डरवर ते नियम पाळण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नसते.

Topics mentioned in this article