मंगेश जोशी, प्रतिनिधी
Gold and Silver rate today : केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ करत 15 टक्क्यावर आयात शुल्क केल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात याचे परिणाम दिसू लागले आहेत. बाजार सुरू झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी उसळी दिसून येत आहे. जीएसटीसह सोन्याचे भाव 1 लाख 65 हजाराच्या जवळपास तर चांदी जीएसटीसहित 3 लाखाच्या जवळ पोहोचली आहे. 12 मे, मंगळवारी सोन्याचे दर (sale rate) 1,53,000 रुपयांच्या जवळपास होते. तर चांदी 2,77,800 च्या घरात होती. अवघ्या एकाच दिवसात सोनं तब्बल 7,900 रुपयांनी तर चांदींचे भाव 19,600 रुपयांनी वाढल्याचं दिसून येत आहे.
सोनं-चांदी कितीने वाढलं?
आयात शुल्कात 15 टक्क्यांची वाढ होताच सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात 8 हजार रुपयांची तर चांदीच्या भावात 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 1 लाख 59 हजार रुपये तर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे भाव 2 लाख 85 हजार रुपये तर जीएसटीसह 2 लाख 93 हजार 550 रुपयांवर आहेत. जागतिक सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली नसून आयात शुल्क 15 टक्के वाढ झाल्याने भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याची सराफा व्यावसायिकांकडून सांगितलं जात आहे. आयात शुल्क 6 टक्क्यावरून 15 टक्क्यांवर म्हणजेच 9% नी आयात शुल्क वाढल्याने सोन्या-चांदीचे भाव 14 टक्क्यांनी वाढणार असल्याचा सराफा व्यवसायिकांनी अंदाज वर्तवला आहे.
जागतिक बाजारात मोठी वाढ नाही, आयात शुल्क वाढीचा फटका
केंद्र सरकारकडून सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्यानंतर सुवर्ण बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या भावात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या भावात 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज जळगावमध्ये सोन्याचे दर 1 लाख 59 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले असून जीएसटीसह हा दर 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर गेला आहे. तर चांदीचे दर 2 लाख 85 हजार रुपये असून जीएसटीसह 2 लाख 93 हजार 550 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जागतिक बाजारात मोठी वाढ नसतानाही केवळ आयात शुल्क वाढीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world