PM Kisan 21st installment: दिवाळीआधीच शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट? पीएम किसान योजनेबाबत अपडेट आली समोर

PM Kisan Yojana 21st Installment Date 2025: यापूर्वीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून जारी करण्यात आला होता. त्यावेळी 9.71 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan 21st installment: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसांत 2000 रुपयांचा हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 

या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग सप्टेंबरच्या अखेरीस तारखा जाहीर करू शकते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवू शकते. त्यामुळेच शेतकऱ्यांना २००० रुपयांचा पुढील हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

(नक्की वाचा-  RBI Recruitment 2025: रिझर्व्ह बँकेत अधिकारी बनण्याची संधी; 120 जागांसाठी भरती, चेक करा पात्रता आणि वेळापत्रक)

यापूर्वीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून जारी करण्यात आला होता. त्यावेळी 9.71 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती.

Advertisement

पैसे अडकणार नाहीत याची खात्री कशी कराल?

अनेक शेतकऱ्यांचे पैसे विविध कारणांमुळे अडकतात. त्यामुळे 21 व्या हप्त्याचे पैसे खात्यात वेळेवर यावेत यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही याची तपासणी करावी. भूमी पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यास हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात.

(नक्की वाचा-  Bank Of Maharashtra Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती)

तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासाल?

तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर pmkisan.gov.in जा. तिथे 'Farmers Corner' मध्ये जाऊन 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता. तसेच, 'Beneficiary List' मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादीही पाहू शकता.

Advertisement