
RBI Recruitment 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. आरबीआयने 2025 या वर्षासाठी 120 ‘ग्रेड बी' अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार 30 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भरतीमध्ये तीन विभागांमध्ये पदांची विभागणी
- ग्रेड बी (डीआर) – जनरल: 83 पदे. कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह पदवी (एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडीसाठी 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडीसाठी उत्तीर्ण गुण) आवश्यक. सीए किंवा समकक्ष पदवी असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
- ग्रेड बी (डीआर) – आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग (DEPR): 17 पदे. अर्थशास्त्र, वित्त, अर्थमिती किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक.
- ग्रेड बी (डीआर) – सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (DSIM): 20 पदे. सांख्यिकी, गणितीय सांख्यिकी, गणितीय अर्थशास्त्र किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
- अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 पर्यंत 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. एमफिल किंवा पीएचडी (PhD) असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा अनुक्रमे 32 आणि 34 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- अर्ज शुल्क : सर्वसाधारण/ओबीसी (General/OBC) उमेदवारांसाठी 850 रुपये, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी (SC/ST/PwBD) उमेदवारांसाठी 100 रुपये आहे.
(नक्की वाचा- Bank Of Maharashtra Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती)
निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे वेळापत्रक
- प्रिलियम परीक्षा : 18 ऑक्टोबर (जनरल) आणि 19 ऑक्टोबर (डीईपीआर, डीएसआयएम) रोजी ऑनलाइन परीक्षा होईल. यात 200 गुणांसाठी 200 प्रश्न असतील. विषय: जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि रिझनिंग.
- मुख्य परीक्षा : 6 डिसेंबर रोजी ऑनलाइन/लेखी परीक्षा होईल. यात तीन पेपर असतील: इकॉनॉमिक्स आणि सोशल इश्यूज (100 गुण), इंग्लिश रायटिंग स्किल्स (100 गुण), आणि फायनान्स आणि मॅनेजमेंट (100 गुण).
- मुलाखत: मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल. मुलाखत 50 गुणांची असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world