Investment : वयाच्या 35 व्या वर्षी PPF खातं उघडा, निवृत्तीनंतर मिळेल 61,000 टॅक्स फ्री मासिक पेन्शन

काय आहे ही योजना? कुठे नोंदनी करू शकाल?

जाहिरात
Read Time: 2 mins

निवृत्तीनंतर तुम्हाला प्रति महिना 60,989 रुपये पेन्शन मिळू शकतं तेही टॅक्स फ्री. PPF नावाची एक सरकारी योजना आहे, जी तुम्हाला म्हातारपणात फायदेशीर ठरू शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, Public Provident Fund Account (PPF) म्हणजेच  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं याविषयी प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलं असेल. अनेकांनी याअंतर्गत खातंही उघडलं असेल. PPF खातं ही सुरक्षित भविष्यासाठी बचत करण्याची आणि टॅक्सफ्री असलेली केंद्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे. नियमितपणे, सातत्याने गुंतवणूक केली तर निवृत्तीवेळी तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

PPF खातं कसं उघडाल अन् कुठे?
सरकारच्या अत्यंत लोकप्रिय बचत योजना PPF मध्ये, कोणताही भारतीय कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकतो. ज्यामध्ये खातेदाराला प्रत्येक आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) किमान 500 रुपये  आणि जास्तीत जास्त ₹ 1,50,000 जमा करावे लागतात. 

नक्की वाचा - Smart Pension Plan: गुंतवणूक एकदा, आयुष्यभर फायदा! काय आहे LIC 'स्मार्ट' पेन्शन योजना'? पाहा A to Z माहिती

Advertisement

EEE च्या कॅटेगरीतील योजनेत पीपीएफमध्ये कधीच कोणताही टॅक्स लागत नाही...
पीपीएफबद्दल फायदेशीर गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. पीपीएफ खात्यात दरवर्षी जमा करणाऱ्या रकमेवर आयकरात सूट मिळते. या खात्यात दरवर्षी तुम्हाला मिळणारं व्याज टॅक्सफ्री असतं.याशिवाय मॅच्युरिटीच्या वेळी हातात येणाऱ्या रकमेवरही टॅक्स लागत नाही.

पीपीएफ खात्यामुळे 25 वर्षांत करोडपती कसं व्हाल?
सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला सुमारे ₹ 61000 पेन्शनची व्यवस्था कशी करता येईल? तुमचे वय 35 वर्षे असल्यास आणि तुम्ही या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला PPF खातं उघडलं आणि 1,50,000  जमा केले, तर पुढील वर्षी 31 मार्च रोजी तुमच्या PPF खात्यात 10,650 व्याज म्हणून जोडले जातील. सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार PPF च्या गुंतवणुकीवर 7.1 टक्क्याने व्याज दिलं जातं. या व्याजामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2025 रोजी तुमच्या PPF खात्यात 1,60,650 रक्कम दिसेल. जी नव्या आर्थिक वर्षात ५ एप्रिलच्या पूर्वी जमा केल्यास 1,50,000 वरुन 3,10,650 इतकी होईल. यानंतर 31 मार्च 2026 रोजी, या रकमेवर 22,056 रुपये व्याज मिळेल आणि 3,32,706 रुपये शिल्लक राहतील. 

Advertisement

वयाच्या 35 व्या नर्षी पीपीएफ खातं उघडलं असेल तर याच्या मॅच्युरिटीपर्यंत तुम्ही 50 वर्षांचे व्हाव. मात्र तरीही निवृत्तीसाठी दहा वर्षे शिल्लक असतील. PPF खात्याशी संबंधित नियमांनुसार, तुम्ही तुमच्या PPF खात्याची मुदत पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करून 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढ करू शकता.