Saving Tips : जगात सर्वात कठीण काम पैसे कमावणं आहे. मात्र त्याही पेक्षा कठीण काम Saving करणं आहे. आजूबाजूला इतकी प्रलोभनं असताना पैशांची बचत करणं ही मोठी बाब. कारण बचत चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांसाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे योग्य प्रकारे बचत करणं तुम्हाला कोट्यवधी बनवू शकतं.
दहावी पास एका कर्मचाऱ्याने 25 वर्षात तब्बल 1 कोटींची बचत केली. जेव्हा त्याची बचतीची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली तर लोक अवाक् झाले. नक्की ही बाब अनेकांसाठी धक्कादायक आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी कशी केली इतकी बचत?
25 वर्षात झाला कोट्यवधी (Bengaluru Proofreader Saves Rs 1 Crore)
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा कर्मचारी एक प्रुफरीडर आहे. 4200 रुपये महिना पगारापासून त्याच्या पगाराची सुरुवात झाली. मेहनत आणि सातत्याने हा पगार 63,000 महिना पर्यंत पोहोचला. ही व्यक्ती अत्यंत साधं आयुष्य जगतो आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याऐवजी भाड्याच्या घरात राहतो. त्याने Fixed आणि recurring deposits च्या माध्यमातून आपल्या बचतीत वाढ केली. जास्त खर्च आणि कर्ज घेणं त्याने टाळलं. आपल्या या बचतीच्या पॉलिसीतून कर्मचारी आज 48 व्या वर्षी एक कोटींचा मालक आहे. आणि यामुळे त्याचं कुटुंब सुरक्षित झालं आहे. रेडिट पोस्टमध्ये कर्मचाऱ्याने आपल्या कोट्यवधी होण्याचा संपूर्ण प्लान सांगितला आहे. (How to save)
नक्की वाचा - GST परिषदेची आजपासून बैठक, Tax स्लॅब कमी करण्यावर घेणार निर्णय; किराणा सामानापासून कारपर्यंत काय स्वस्त होणार?
Reached a (major) milestone -- 1 Crore, took me 25 years
byu/srikavig inpersonalfinanceindia
1 कोटींची बचत कशी झाली? (Saves Rs 1 Crore In 25 Years)
कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, गावात आमचं वडिलोपार्जित घर आहे. निवृत्तीनंतर आम्ही तिथं जाऊन राहू. आम्ही आर्थिकदृष्ट्या नेहमी सक्षम राहिलोय. सुदैवाने आम्हाला कधीही मोठा आजार किंवा अडचणीचा सामना करावा लागला आहे. आम्ही आरोग्याची काळजी घेतो. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याची वेळ कमी येते. शिक्षण, बुद्धी, आरोग्य आणि वेळ ही व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्याशिवाय लाँग टर्म टार्गेट पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि शिस्तीची आवश्यकता असते. बचतीची शिकवण देणाऱ्या या कर्मचाऱ्याची पोस्टवर सोशल मीडिया युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे.
कर्मचाऱ्याचं होतंय कौतुक
एका युजरने लिहिलंय, सध्या एकमेकांच्या स्पर्धेत व्यक्ती स्वत:चं मोठं नुकसान करीत आहे. तुमच्या बचतीच्या या आयडियामुळे लोक या मार्गाने विचार करीत आहे.
कशी केली बचत?
कर्मचाऱ्याने सांगितलं की, आमच्या कुटुंबात आम्ही तिघं आहोत. माझ्या पत्नीने कधीच नोकरी केली नाही. महिन्याला आम्हाला 25 हजार खर्च येतो. आम्ही बंगळुरूच्या मुख्य शहरापासून थोडं लांब राहतो. इथं 1BHK साठी महिन्याला 6,500 रुपये भाडं आहे. आम्ही फारशी घरं बदलत नाही. गेल्या 25 वर्षात मी चार वेळा घरं बदलली आहेत. आम्ही प्रत्येक महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेपर्यंत घरमालकाकडे भाड्याचे पैसे सोपवतो.
महत्त्वाची टीप - Fixed deposits नॉन-क्युम्युलेटिव्ह असतात म्हणजेच, मला सर्व व्याज दरमहा मिळतं आणि ते मी दर महिन्याला नव्या Fixed deposits मध्ये जोडत असतो.