निवडणुकीनंतरही EMI मध्ये दिलासा नाहीच, RBI ची घोषणा, रेपो रेट जैसे थे!

केंद्रीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये वाढ करीत 6.50 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून यात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीची बैठक 5 जूनपासून सुरू झाली आहे. तीन दिवस सुरू असलेल्या या बैठकीत 7 जून, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या यंदाच्या पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. 

सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये वाढ करीत 6.50 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महागड्या लोनपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमपीसीची ही पहिली बैठक होती. या निवडणुकीत भाजप तिसऱ्यांना स्वबळावर निवडून येण्यात अपयशी ठरली. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे.  
 

बातमी अपडेट होत आहे. 

Topics mentioned in this article