RIP Ratan Tata : भारताने एक दिग्गज दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावलं - गौतम अदाणी 

Ratan Tata : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदाणींनी रतन टाटा यांना आधुनिक भारताचे प्रणेते म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ratan Tata Passed away : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांना मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणीत अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदाणींनी रतन टाटा यांना आधुनिक भारताचे प्रणेते म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे. 

त्यांनी सोशल मीडियावरुन आपली भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, भारताने एक महान आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व गमावलंय. रतन टाटांनी आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने रचना केली. टाटा केवळ एक उद्योगपती नव्हते, त्यांच्यात सत्यनिष्ठा, दयाभाव आणि व्यापक विकासासाठी वचनबद्धता होती. त्यांच्यासारख्या महापुरुषांचं अस्तित्व आपल्यातून कधीच जात नाही, अशी भावना गौतम अदाणी यांनी व्यक्त केली. 

नक्की वाचा - Ratan Tata demise : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार? कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी Xवर पोस्ट करत रतन टाटा यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.   

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, "रतन टाटाजी एक दूरदृष्टी असणारे धडाडीचे उद्योगपती होते. मात्र त्याचवेळी ते कनवाळू आणि अत्यंत सहृदयी होते.  त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. बोर्डरूमपलीकडे जात त्यांनी समाजासाठी योगदान दिले.  नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी होती."