ATM मधून पैसे काढणं झालं महाग, SBI ने शुल्क वाढवले; व्यवहाराचे नवे नियम जाणून घ्या!

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचं खातं असेल आणि तुम्ही एटीएममधून नियमित कॅश काढत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचं खातं असेल आणि तुम्ही एटीएममधून नियमित कॅश काढत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने एटीएम ट्रान्जॅक्शन चार्जमध्ये वाढ केली आहे. हा बदल १ डिसेंबर २०२५ पासून लागू झालेला आहे. दुसऱ्या बँकेंचं कार्ड वापरून एसबीआयच्या एटीएमचा वापर करीत असाल तर तुमच्यावर याचा परिणाम होईल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट शुल्क वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

एटीएम चार्ज का वाढले? (Why did SBI increase ATM charges?)

एसबीआयने सांगितलं, एटीएम/एडीडब्ल्यूएम (Automated Deposit cum Withdrawal Machine)   वर आकारण्यात येणारे इंटरचेंज शुल्क वाढले आहेत. यामुळे बँकेला त्यांच्या सेवा शुल्क नियमांवर पुनर्विचार करावा लागला. मागील एटीएम शुल्कात १ फेब्रुवारी २०२५ रोजी बदल करण्यात आले होते.

नॉन-SBI एटीएमवर मोफत व्यवहार मर्यादा (Free transaction limit at non-SBI ATMs)

एसबीआय सेव्हिंग खातं असलेल्या ग्राहकांसाठी मोफत व्यवहार करण्याच्या संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राहक आताही दुसऱ्या बँकातील एटीएममधून महिन्यात पाच फ्री फायनॅन्शल आणि नॉन-फायनॅन्शल व्यवहार करू शकतात. यानंतर फ्री लिमिटनंतर कॅश विड्रॉ चार्ज वाढून २३+GST करण्यात आला आहे. जो आधी २१ + जीएसटी होता. तर नॉन फायनॅन्शियल ट्रान्जॅक्शनवर ११ + GST चार्ज असेल, जो आधी १० + जीएसटी होता. 

एसबीआय सॅलरी अकाऊंट असणाऱ्यांसाठी काय बदललं?  (Latest SBI salary account charges)

सॅलरी पॅकेज सेव्हिंग्ज अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठा बदल झाला आहे. आता नॉन एसबीआय एटीएमवर महिन्यात केवळ १० ट्रान्जॅक्शन मिळतील. यामध्ये फायनॅन्शिल आणि नॉन-फायनॅन्शियल अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे. आतापर्यंत ही सुविधा अमर्यादीत होती. आता फ्री लिमिटनंतर कॅश विड्रॉवर २३ + जीएसटी आणि नॉन फायनॅन्शियव ट्रान्सजॅक्शनवर ११ + जीएसटी द्यावे लागतील. 

Advertisement

बेसिक सेव्हिंग खातेधारकांना दिलासा (Basic Saving Bank Deposit – BSBD account)

SBI च्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे. या कॅटेगरीमध्ये कोणतेही नवे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याचे सर्विस चार्ज आधीप्रमाणे असतील. 

 

Topics mentioned in this article