SBI RTXC scheme: भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या पगारदार ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने 'रिअल-टाइम एक्सप्रेस क्रेडिट' (RTXC) ही विशेष सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहक अवघ्या काही मिनिटांत 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवू शकतात, तेही कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय.
काय आहे RTXC ऑफर?
ही एक पूर्णपणे डिजिटल कर्ज प्रक्रिया आहे. ज्या ग्राहकांचे पगार खाते (Salary Account) SBI मध्ये आहे, त्यांना हे कर्ज दिले जाते.
- कर्जाची मर्यादा: किमान 25 हजार ते कमाल 35 लाख रुपये.
- डिजिटल प्रक्रिया: कागदपत्रांची प्रत्यक्ष गरज नाही, सर्व प्रक्रिया YONO ॲपद्वारे पूर्ण होते.
- ई-साइन सुविधा: आधार OTP च्या मदतीने तुम्ही कर्जाच्या करारावर डिजिटल स्वाक्षरी करू शकता.
कोणाला मिळणार हे कर्ज?
- केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण दल आणि नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी.
- तुमचे मासिक वेतन SBI च्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होणे अनिवार्य आहे.
- किमान निव्वळ मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असावे.
- क्रेडिट स्कोर किमान 650 ते 700 च्या वर असावा.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
व्याजाचा दर आणि प्रक्रिया
या कर्जाचे व्याज दर 2 वर्षांच्या MCLR शी जोडलेले असून संपूर्ण कालावधीसाठी ते निश्चित राहतात. तुमची देणी तुमच्या उत्पन्नाच्या 50 ते 60 टक्क्यांपेक्षा कमी असावीत.
अर्ज कसा करावा?
- तुमच्या मोबाईलमधील SBI YONO ॲप उघडा.
- 'Loans' विभागात जाऊन 'Express Credit' वर क्लिक करा.
- तुमची पात्रता तपासा आणि कर्जाची रक्कम निवडा.
- आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर येणारा OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा. काही वेळातच कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.