नव्या SEBI प्रमुखांचा लवकरच सुरु होणार शोध, अर्थमंत्रालयातील सुत्रांची महत्त्वाची माहिती

New Sebi Chief : येत्या काही दिवसातच केंद्रीय अर्थमंत्रालय सेबीच्या प्रमुखपदासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


येत्या काही दिवसातच केंद्रीय अर्थमंत्रालय सेबीच्या प्रमुखपदासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. त्यामुळे नव्या सेबी प्रमुखांचा शोध नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असं एनडीटीव्ही प्रॉफिटला अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलंय. माधबी पुरी बुच यांच्या सेबी अध्यक्षपदाला मुदत वाढ मिळणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण नवा अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरु करावीच लागणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून माधबी पुरी बुच आणि त्याचे पती धवल बुच यांच्यावर विविध प्रकारचे हितसंबंध जपण्याबाबतचे आरोप करण्यात आले आहेत. बुच अध्यक्षपदी येण्याआधीचे सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांचा कार्यकाळ चार वर्षांनी वाढवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात नवे सेबी प्रमुख शोधण्याची प्रक्रिया सुरु होतीच.. त्याआधीचे सेबी प्रमुख यू. के. सिन्हा यांनाही दोन वेळा मुदतवाढ मिळाली होती. यू के सिन्हा यांनाही मुदतवाढ दिली जात असताना नव्या सेबी प्रमुख शोधण्याची प्रक्रिया समांतर पद्धतीनं सुरु होती.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

फेब्रवारी 2022मध्ये माधबी पुरी बुच यांची सेबी प्रमुखपदी यांची नियुक्ती झाली. बुच त्यावेळी सेबीच्या पूर्णवेळ सदस्या होत्या. बुच या सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत, शिवाय खासगी क्षेत्रातून सेबीच्या प्रमुख झालेल्याही त्या पहिल्याच महिला आहेत. त्यांचा कार्यकाळ येत्या 28 फेब्रवारी 2025मध्ये संपणार आहे.  

कशी होते सेबी प्रमुखाची निवड?

सेबी प्रमुखपदाची निवड करण्याकरिता केंद्रीय अर्थ सचिवांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक नियामक नियुक्ती शोध समिती the Financial Sector Regulatory Appointments Search Committee (FSRASC) स्थापन करण्यात आलेली आहे. ही समितीच नवा सेबी प्रमुखांचा शोध घेते. सरकार नियमित पद्धतीनं, उमदेवारांच्या अर्जाची छाननी करते. यानंतर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात.

( नक्की वाचा : Muhurat Trading on Diwali 2024 : 'मुहूर्त ट्रेडिंग'ची घोषणा; तारीख आणि वेळही आली समोर )

मुलाखत घेण्याची जबाबदारी अर्थमंत्रालयातील सचिव आणि  तीन तज्ज्ञ आणि स्वतंत्र सदस्यांची समितीवर असते. या मुलाखतींच्या आधारे समिती एक अहवाल तयार करते. हा कॅबिनेटच्या नियुक्ती समितीसमोर जातो. पंतप्रधान स्वतः कॅबिनेटच्या नियुक्ती समितीचे प्रमुख आहेत. अहवालावर चर्चा करुन मगच सेबी प्रमुखाचं नाव निश्चित करण्यात येतं. 

Topics mentioned in this article