डिसेंबर महिन्याला सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग शेअर बाजार कोसळला असून बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे दीड टक्क्यांनी घसरले, त्यामुळे अनेक शेअर कंपन्यांसह गुंतवणुकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर आजही शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी जोरदार कोसळला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अपेक्षित पाव टक्का व्याजदर कपात केलीय. पण भविष्यात व्याजदरात कपातीची शक्यता कमी असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे अमेरिकन आणि आशियाई बाजारात विक्रीचा धडाका सुरू आहे. अमेरिकचा डाऊ जोन्स निर्देशांक काल ११०० अंकांनी घसरला. तर आज सकाळी ऑस्ट्रेलियाचा बाजार २ % गडगडला. जपानी बाजारातही २ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आज भारतीय बाजार सुरूवातीला मोठ्या घसरणीसह उघडला.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर
दुसरीकडे आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारी डॉलरने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे. बुधवारी तीन पैशांनी घसरले आणि 84.94 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. मंगळवारी रुपया प्रति डॉलर 84.91 वर बंद झाला होता तर बुधवारी तो 84.92 प्रति डॉलरवर उघडला होता. दिवसभरातील व्यवहारात ते प्रति डॉलर 84.95 पर्यंत खाली आले आणि शेवटी तीन पैशांनी घसरून 84.94प्रति डॉलर या आत्तापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाले आहेत.