Share Market Today : शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांनी 17 लाख कोटी गमावले; घसरणीची 5 कारणे

Share Market Fall 5 Reasons : सेन्सेक्स 3100 अंकानी खाली आला आहे. तर निफ्टी 1000 अंकांनी घसरुन  21,900 च्या खाली आला आहे. सेक्टोरल इंडेक्स  8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.  अवघ्या पाच मिनिटात भारतीय गुंतवणूकदारांनी जवळपास 18 लाख कोटी रुपये गमावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ट्रम्प टॅरिफने भारतीय शेअर बाजाराला हादरे बसले आहेत. आज 8 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 3100 अंकानी खाली आला आहे. तर निफ्टी 1000 अंकांनी घसरुन  21,900 च्या खाली आला आहे. सेक्टोरल इंडेक्स  8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.  अवघ्या पाच मिनिटात भारतीय गुंतवणूकदारांनी जवळपास 17 लाख कोटी रुपये गमावले आहे. शेअर बाजारातील पडझडीची पाच मुख्य कारणे काय आहेत, हे जाणून घेऊयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन आयातीवर 34% शुल्क लादले आहे. त्याच वेळी, युरोपियन युनियनसह इतर देश देखील यासाठी तयारी करत आहेत. यामुळे जगभरात व्यापार युद्धाची भीती बळावली आहे. यातून गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. अलिकडच्या वाढीचा आणि बाजारातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार विक्री करत आहेत.

आशिया बाजारांत पडझड

आशियाई बाजारातील विक्रीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. जपानचा निक्केई 6% पेक्षा जास्त घसरला. त्याचप्रमाणे तैवान, हाँगकाँग, जपान, चीन आणि कोरियामधील बाजारपेठांमध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. याआधी अमेरिकन शेअर बाजारातही मोठी पडझड झाली. जगभरातील बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.

(नक्की वाचा- Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?)

अमेरिकेत मंदीची भीती

या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत मंदीची भीती बळावली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक जागतिक संस्थांनी यावर्षी अमेरिकेत मंदीची भीती व्यक्त केली आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे अमेरिका मंदीत पडली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. या भीतीमुळे भारतासह आशियाई बाजारपेठांमध्ये घसरण होत आहे.

Advertisement

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री

परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्री सुरू केली आहे. यामुळेही भारतीय शेअर बाजाराला हादरे बसू लागले आहेत. 2 एप्रिलपर्यंत, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफआधी गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचे वृत्त होते. मात्र त्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. 

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

भारतीय रुपया कमजोर

भारतीय रुपया आज डॉलरच्या तुलनेत 50 पैशांनी कमकुवत झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 85.74 वर उघडला. बाजारातील हालचालींवर परिणाम करण्यात रुपयाच्या कमकुवतपणानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Advertisement