Share Market Update: शेअर बाजारातील घसरणीची मालिका सुरुच आहे. आठवड्याची (24 फेब्रुवारी 2025) सुरुवाताच शेअर बाजारात पुन्हा घसरणीची नोंद झाली आहे. शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये मोठी घसरण नोंदली गेली.
सोमवारी सकाळी 10.45 वाजता सेन्सेक्स 767.68 अंकांनी म्हणजे 1.03 टक्क्यांनी घसरून 74,538.36 वर पोहोचला. तर निफ्टी 235.85 अंकांनी म्हणजे 1.04 टक्क्यांनी घसरून 22,552.05 वर पोहोचला.
कमकुवत जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे शेअर बाजारात ही घसरण दिसून येत आहे. आज, रिअल इस्टेट, मध्यम-लहान आयटी आणि टेलिकॉम आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वात मोठी घसरण निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये नोंदवली गेली. जी 2.21 टक्के घसरून 825.80 वर आली. याशिवाय निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉम इंडेक्स 2.04 टक्के घसरून 9,280.55 वर आणि निफ्टी मीडिया इंडेक्स 1.73 टक्के घसरून 1,466.55 वर आला.