जाहिरात

Success Story : 38 हजारांच्या नोकरीला मारली लाथ; 2 लाखांची गुंतवणूक आता दरमाह एक लाखाची कमाई

आताच्या नोकरीच्या मार्केटमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वजण आपली नोकरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Success Story : 38 हजारांच्या नोकरीला मारली लाथ; 2 लाखांची गुंतवणूक आता दरमाह एक लाखाची कमाई
प्रतिकात्मक फोटो

Success Story : आताच्या नोकरीच्या मार्केटमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वजण आपली नोकरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र एका तरुणाने नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अंकित पांडेय नावाच्या एका युजरची पोस्ट व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टनुसार, एका तरुणाने ३८ हजार महिना पगाराची नोकरी सोडून चहाचं दुकान सुरू केलं. ही पोस्ट पाहून अनेकजण आपल्या प्रतिक्रिया शेयर करीत आहेत. सुरुवातीला लोकांनी त्याची खूप थट्टा उडवली, मात्र त्याने त्याची टिंगल करणाऱ्यांना चुकीचं ठरवलं. 

पोस्टमध्ये काय लिहिलंय?

आपल्या पोस्टमध्ये अंकितने लिहिलंय, त्याचा शेजारी आधी टेलिपरफॉर्मेन्स कंपनीत नोकरी करीत होता आणि दरमहिन्याला ३८ हजार रुपये कमवित होता. मात्र वाढता खर्च आणि ग्रोथ होत नसल्याने त्याने मे महिन्यात नोकरी सोडून दिली. त्याने नोकरी सोडल्यानंतर अनेकांनी त्याला वेड्यात काढलं. काहींनी म्हटलं की, तो सर्वात मोठी चूक करीत आहे. मात्र त्याने कुणाचं म्हणणं ऐकलं नाही आणि स्वत:वर विश्वास ठेवला. 

नक्की वाचा - Success story : वय अवघं 26, आयआयटीयन सिद्धार्थने एकाच दिवसात कमावले चक्क 77 कोटी, पणं कसे?

२ लाख रुपयांची गुंतवणूक अन्...

नोकरी सोडल्यानंतर त्याने २ लाखांची गुंतवणूक केली आणि ऑटो स्टँडजवळ एक दुकान सुरू केलं. इतकच नाही, त्याने दोन महिला कर्मचाऱ्यांनाही कामावर ठेवलं. जे चहा तयार करण्यासह सर्व्ह करण्याचं काम पाहत होत्या. त्याने पोस्टमध्ये पुढे म्हटलं, दुकानात मिळणाऱ्या पदार्थांचा मेन्यू अत्यंत सोपा होता. चहा १० रुपयात विकली जात होती. चांगली क्वालिटी आणि सर्व्हिसमुळे हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. 

आता दरमाह लाखोंची कमाई...

पोस्टमध्ये पुढे लिहिलं, त्याच्या दुकानावर दररोज ४०० कप चहा विकले जात होते. दररोज तब्बल ६००० रुपयांची विक्री होते. त्यानुसार, महिन्याचा बिझनेस १.८ लाखांपर्यंत होतो. दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांची सॅलरी, चहा तयार करण्याचं सामान आणि बाकी सर्व खर्च काढून त्याच्याजवळ दरमाह १ लाखांचा नफा शिल्लक राहतो. ज्या नोकरीत इतकी मेहनत केल्यानंतकही तो ३८ हजार रुपये कमवित होता, आता त्याची महिन्याची कमाई एक लाखांपर्यंत पोहोचली आहे. 

पोस्टनुसार, त्याने आपल्या दुकानावर वडापाव, सामोरा आणि जिलेबीचा नवा काऊंटर सुरू केला आहे. याच्या आनंदात त्याने आपल्या शेजाऱ्याला गोड दिलं आणि नव्या सुरुवातीचा आनंद व्यक्त केला. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com