Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर 40% का घसरले? गुंतवणूकदारांना काय मिळणार?

Tata Moters : कंपनीने अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सीव्ही व्यवसायाला वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडून नुकतीच अंतिम मंजुरी मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tata Motors Demerger: देशातील एक प्रमुख ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी आज मोठा धक्का बसला. कंपनीचा व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळा करण्याची प्रक्रिया म्हणजेच डीमर्जर आजपासून अंमलात येत आहे. यामुळे आज कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 40 टक्क्यांची मोठी घसरण दिसून येत आहे. डीमर्जरच्या प्रक्रियेमुळे आणि प्राइस ॲडजस्टमेंटमुळे ही घसरण झाली असून, सकाळी स्पेशल प्री-ओपन सेशननंतर शेअर 399 रुपये प्रति शेअर दराने उघडला आहे.

टाटा मोटर्सचे दोन स्वतंत्र विभाग

टाटा मोटर्स लिमिटेडचा शेअर आता त्याच्या व्यावसायिक वाहन (CV) व्यवसायाशिवाय व्यवहार करत आहे. कंपनीने अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सीव्ही व्यवसायाला वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडून नुकतीच अंतिम मंजुरी मिळाली आहे. या डिमर्जरनंतर आता टाटा मोटर्स कंपनी दोन पूर्णपणे स्वतंत्र एंटिटी Tata Motors Passenger & EV Business आणि Tata Motors CV Business मध्ये विभागली जात आहे.

(नक्की वाचा-  Gold Price: 1 किलो सोन्यात खरेदी करता येईल 9 कोटींची रोल्स रॉयस कार; हर्ष गोएंका यांची पोस्ट चर्चेत)

शेअरची किंमत आणि एक्सचेंजची प्रक्रिया

डीमर्जरच्या प्रक्रियेनुसार, 14 ऑक्टोबर ही कमर्शियल व्हेहिकल व्यवसायाच्या डीमर्जरसाठी रेकॉर्ड डेट आहे. यामुळे, NSE वर टाटा मोटर्ससाठी आज सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान एक स्पेशल प्री-ओपनिंग सेशन आयोजित करण्यात आले होते. सोमवार, 13 ऑक्टोबरचा जो टाटा मोटर्सचा क्लोजिंग प्राइस होता आणि स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये जो नवीन ओपनिंग प्राइस निश्चित झाला, या दोन्हीमधील फरकावरून सीव्ही व्यवसायाच्या शेअरची किंमत अंदाजित केली जाईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं?)

गुंतवणूकदारांना काय मिळणार?

टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 1:1 चा शेअर स्वॅप रेशिओ जाहीर केला आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे रेकॉर्ड डेटपर्यंत टाटा मोटर्सचा एक शेअर असेल, तर त्याला नवीन कमर्शियल व्हेईकल कंपनीचा एक शेअर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत मिळेल. ही प्रक्रिया स्वयंचलित असेल आणि काही काळानंतर हे नवीन शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये आपोआप दिसू लागतील. सीव्ही व्यवसायाच्या लिस्टिंगची कोणतीही निश्चित तारीख कंपनीने दिलेली नाही, मात्र कंपनीने सांगितले आहे की पुढील चार ते सहा आठवड्यांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ही लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article