जाहिरात

Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,

या कारला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे.

Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
  • टाटा मोटर्सची आयकॉनिक टाटा सिएराचा आधुनिक अवतार लॉन्च झाला आहे
  • नवीन सिएरामध्ये 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनांसह 6-स्पीड मॅन्युअल दिले आहेत.
  • भारतातील पहिली आंतरक्रीया कार म्हणून 5G कनेक्टिव्हिटी, डॉल्बी ॲटमॉस साउंड सिस्टीम यांसह प्रगत तंत्रज्ञान आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Tata Motors Sierra SUV Launch: 90 च्या दशकात भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली 'टाटा सिएरा' (Tata Sierra) एसयूव्ही अखेर आधुनिक अवतारात दाखल झाली आहे. 'लीजेंडचा पुनर्जन्म' (Rebirth of a Legend) असे वर्णन करत टाटा मोटर्सने या आयकॉनिक एसयूव्हीचे औपचारिक अनावरण केले. या नवीन सिएराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹11.49 लाख निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल (ICE) इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. मात्र कंपनीने लवकरच तिचे इलेक्ट्रिक व्हर्जन (Sierra EV) acti.ev प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

शक्तिशाली इंजिन आणि कार्यक्षमता

  • नवीन सिएरामध्ये पॉवर आणि परफॉर्मन्ससाठी शक्तिशाली इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.
  • नवीन 1.5 लीटर TGDi हायपीरियन टर्बो-पेट्रोल इंजिन, जे 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते.
  • 1.5 लीटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.
  • ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी (DCT) चे पर्याय दिले आहेत.
Latest and Breaking News on NDTV

प्रगत तंत्रज्ञान आणि प्रमुख वैशिष्ट्ये
टाटा मोटर्सने सिएरामध्ये नोस्टाल्जिया आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा मिलाफ साधला आहे. या एसयूव्हीमध्ये इन-बिल्ट 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. ज्यामुळे ही सुविधा असणारी ही भारतातील पहिली ICE कार ठरली आहे. प्रीमियम म्युझिक अनुभवासाठी डॉल्बी ॲटमॉस (Dolby Atmos) साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. मूळ सिएराची आठवण करून देणारा मोठा पॅनोरामिक सनरूफ, पावर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट तसेच ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारख्या लक्झरी सुविधांचा समावेश आहे.

सुरक्षा आणि उपलब्धता
सुरक्षेच्या दृष्टीने टाटाने या एसयूव्हीला 5 स्टार रेटिंगपेक्षा अधिक (Beyond 5 Star) सुरक्षितता मानकांची पूर्तता करणारी म्हणून ओळखले आहे. यात 6 एअरबॅग्ज आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी आयसोफिक्स (Isofix) माउंट्स आहेत. या एसयूव्हीसाठी बुकिंग 16 डिसेंबरपासून सुरू होईल आणि ग्राहकांना 15 जानेवारी 2026 पासून डिलिव्हरी मिळणे अपेक्षित आहे. या कारला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे. त्यामुले येणाऱ्या या भन्नाट कारसाठी कसा प्रतिसाद मिळतो हे समजणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com