महिन्याच्या पगारावर अवलंबून राहणाऱ्या मध्यमवर्गाला खर्च कमी-जास्त झाला तरी त्याचे परिणाम सहन करावे लागतात. विशेषत: महिन्याच्या शेवटी अनेकांना आर्थिक चणचण भासते. महिन्याला ठराविक रक्कम मिळेल, अशी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहोत. ही रक्कम तुमच्यासाठी दुसऱ्या पगाराप्रमाणे काम करेल.
प्रत्येक महिन्याला उत्पन्न मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांमध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांचा समावेश आहे. पोस्टाची मासिक उत्पन्न योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला उत्पन्नाची गॅरेंटी देते. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती एकटी किंवा आपल्या पार्टनरसोबत संयुक्तपणे खातं उघडू शकते. एकदा पैसे जमा केल्यानंतर ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला मिळते.
9250 रुपये दर महिना...
वैयक्तिक खात्यात अधिकांश 9 लाख आणि संयुक्त खात्यात 15 लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकता. किमान ठेव कालावधी पाच वर्षे आहे. यामध्ये दर महिन्याला व्याजावर मिळणारे रक्कम मिळते. संयुक्त खातेदार 15 लाख रुपये जमा करून 9250 रुपयांपर्यंत अतिरिक्त महिन्याला पैसे कमवू शकतो. याशिवाय 9 लाख जमा केल्यानंतर 5500 रुपये मासिक व्याज मिळेल.
7.4 टक्के व्याज
पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळतं. याशिवाय लहान मुलाच्या नावावरही खातं सुरू करू शकता. अधिकतर तिघेजणं संयुक्तपणे एक खातं वापरू शकतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची नोंदणी करण्यासाठी व्यक्तींचा पत्ता, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दोन पासपोर्ट साइज फोटोंची आवश्यकता असेल.
5 वर्षांचा लॉक-इन पीरियड
या योजनेत उत्पन्न पाच वर्षांसाठी लॉक केली जाते. खातं सुरू केल्याच्या एक वर्षानंतर आपात्कालिन परिस्थितीत पैसे काढू शकता. एक ते तीन वर्षाच्या आत लवकर पैसे काढल्यावर एकूण जमा रकमेतील 2 टक्के कापले जातात. तर तीन वर्षांनंतर मात्र पाच वर्षांच्या आत पैसे काढल्यास 1 टक्के शुल्क आकारले जातात. पाच वर्षांनंतर मॅच्योरिटी वर संपूर्ण रक्कम परत केली जाते. गुंतवणूकदार पाच वर्षांसाठी रक्कम वाढवू शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा आर्थिक तणाव कमी करू शकतात. हा अत्यंत विश्वासार्ह पर्याय असून यात लोकांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.