जाहिरात

Reliance Jio Vs BSNL :  जिओला झटका, दीड कोटींहून अधिक ग्राहकांनी ठोकला रामराम

Reliance Jio Loses Subscribers : कोट्यवधी ग्राहकांनी जिओची सेवा वापरणे बंद केल्याची माहिती ट्रायने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे समोर आली आहे.

Reliance Jio Vs BSNL :  जिओला झटका, दीड कोटींहून अधिक ग्राहकांनी ठोकला रामराम

Reliance Jio Infocom Ltdला ग्राहकांनी जबरदस्त झटका दिला आहे. गेल्या चार महिन्यात मिळून 1.65 कोटी ग्राहकांनी जिओची सेवा (JIO Company) वापरणे बंद केल्याचे दिसून आले आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीने एकट्या ऑक्टोबर महिन्यात 37.6 लाख ग्राहक गमावल्याची माहिती ट्रायने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केवळ जिओला कंपनीलाच नव्हे तर व्होडाफोनलाही ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा झटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात व्होडाफोनच्या 19.3 लाख ग्राहकांनी या कंपनीची सेवा वापरणे बंद केले आहे. खासगी मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दरवाढ केली होती, या दरवाढीमुळेच ग्राहकांनी या कंपन्यांकडे पाठ फिरवणे सुरू केल्याचे दिसते आहे. 

GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही

(नक्की वाचा: GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही)

बहुतांश मोबाइल सेवा कंपन्यांनी जून महिन्यात दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता, जो जुलै महिन्यात अंमलात आणला. या कंपन्यांनी केलेली दरवाढ ग्राहकांना फारशी आवडली नव्हती. एकीकडे या खासगी कंपन्यांच्या सेवेकडे ग्राहक पाठ फिरवत असताना दुसरीकडे बीएसएनएल या सरकारी मोबाइल सेवा कंपनीचे ग्राहक लक्षणीयरित्या वाढत चालल्याचे दिसून आले आहे.

Bajaj Chetak: 'या' नव्या लुकमध्ये बजाज चेतक मार्केटमध्ये दाखल, पाहा खास फिचर्स आणि किंमत

(नक्की वाचा: Bajaj Chetak: 'या' नव्या लुकमध्ये बजाज चेतक मार्केटमध्ये दाखल, पाहा खास फीचर्स आणि किंमत)

ऑक्टोबर महिन्यामध्ये बीएसएनएलने 5 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. गेल्या चार महिन्यांमध्ये BSNL च्या ग्राहकांची संख्या 68 लाखांनी वाढली आहे. बीएसएनएलचे ग्रामीण भागात चांगले नेटवर्क असून त्यांचे दरही इतरांपेक्षा परवडणारे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यामुळे खासगी कंपन्या चिंतेत असताना बीएसएनएलसाठी मात्र यंदाच्या वर्षाचा शेवट गोड ठरला आहे. जिओ आणि व्होडाफोनच्या ग्राहकांची संख्या घटत असताना सुनील मित्तल यांच्या मालकीच्या भारती एअरटेलने ऑक्टोबर महिन्यात 14.3 लाख नवे ग्राहक जोडले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com