Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख ठरली, अर्थमंत्र्यांकडून तयारीला सुरूवात

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नव्या सरकारचं मंत्रिमंडळही स्थापन झालं आहे. आता सर्वांचं लक्ष संसद सत्रावर आहे. या सत्रात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.  

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली आहे. आता सर्वांचं लक्ष संसद सत्रावर आहे. या सत्रात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार आहे. हे सत्र 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारकडून 2024-25 साठीचा संपुर्ण अर्थसंकल्प सादर केले जाऊ शकतो. निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम बजेट सादर केला होता. आता अर्थमंत्रालयाकडून 17 जूनपर्यंत विविध मंत्रालयांसह बजेटबद्दल बैठकी सुरू करतील. अद्याप सरकारकडून बजेटच्या तारखेबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

नक्की वाचा - भाज्यांनी आणलं रडकुंडीला, फरसबी-दोडका 160 रुपये किलो; महिनाभर दर चढेच राहण्याची शक्यता

बुधवारी नवे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की, 18 व्या लोकसभेचं पहिलं सत्र 24 जूनपासून सुरू होईल आणि 3 जुलैला संपेल. 9 दिवसीय विशेष सत्रादरम्यान लोकसभा अध्यक्षाची निवडणूक घेतली जाईल. यादरम्यान राज्यसभेचं 264 वे सत्र 27 जूनपासून 3 जुलै, 2024 पर्यंत चालेल. हे लोकसभा निवडणुकीनंतरचं पहिलं संसदेतील सत्र आहे. याशिवाय 27 जून रोजी राष्ट्रपती दौपद्री मुर्मू दोन्ही सभांना संयुक्त बैठकीत संबोधित करतील. 

Advertisement