1 जूनपासून मासेमारी बंद झाल्यामुळे सुक्या माशांच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दुसऱ्याकडे पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने किंमतीत दुपटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
उत्पादन कमी होत असल्याने मुंबई बाजार समितीमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाज्यांचा तुटवडा दिसून येत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. फरसबी, वाटाणा, दोडका या भाज्या तब्बल 160 रूपये किलोवर पोहोचले आहेत. पुढील महिनाभर भाज्यांच्या किंमतीत अशीच वाढ पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय पालेभाज्यांच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत कोथिंबिरीची एक मध्यम आकाराची जुडी 40 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर मेथीच्या जुडीच्या किंमतीतही वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - बाजारात पाऊल ठेवायचं तरी कसं? 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ, किमती पाहून धडकीच भरेल!
पावसाळा सुरू होताच बाजारात भुईमुगाच्या शेंगांची मागणी वाढचे. बाजारात भुईमुगाच्या शेंगांचे दर 60 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
भाजीपाल्याचा भाव वाढतोय (दर प्रती किलो)
होलसेल किरकोळ
- कांदा- 21 ते 29 40
- फरसबी 100 ते 120 140 ते 160
- वाटाणा 100 ते 120 140 ते 160
- भुईमूंग शेंगा 60 ते 90 80 ते 100
- भेंडी 55 ते 70 80 ते 100
- गवार 75 ते 85 120 ते 140
- घेवडा 75 ते 85 140 ते 160
- ढोबळी मिरची 50 ते 60 80 ते 100
- शेवगा शेंग 60 ते 80 100 ते 120
नाशिकच्या बाजारातही भाज्या शंभरीपार...
कडाक्याचा उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांवर परिणाम झाला आहे. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांमधील दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. उन्हामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्पादनात घट झाल्याने पालेभाज्या आणि फळं भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून या भाववाढीने कुटुंबाचं बजेट कोलमडलं आहे. गेल्या 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
- 10 ते 20 रुपये असलेली कोथिंबीर 50 ते 60 रुपये
- 10 ते 20 रुपये असलेली मेथी 60 ते 70 रुपये
- 20 ते 30 रुपये असलेली कांदापात 60 ते 70 रुपये
- 5 रुपये असलेला पालक 20 ते 25
- 20 रुपये किलो असलेली मिरची 80 रुपये किलो
- 25 रुपये किलो असलेला टॉमेटो 60 ते 90 रुपये किलो
- 30 रुपये किलो असलेली भेंडी 80 रुपये किलो
- 30 रुपये किलो असलेले वांगे 50ते 60 रुपये किलो
- 40 रुपये किलो असलेले कारले 80 रुपये किलो इतका भाव झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world