Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Budget 2025) यंदा आपला आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जाणून घेऊया 2019 ते 2024 पर्यंत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कोणकोणत्या रंगाची साडी नेसली होती, जाणून घेऊया.
निर्मला सीतारमण यांनी आज मधुबनी आर्टची साडी नेसली आहे. पद्मश्री दुलारी देवींनी त्यांना ही साडी भेट म्हणून दिली आहे. 2021 मध्ये दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आंध्रप्रदेशात पांढऱ्या रंगाची रेशमी आणि जांभळ्या रंगाच्या बॉर्डरची साडी नेसली होती.
2024 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कांथा डिझाईनची निळ्या आणि क्रीम रंगाची साडी नेसली होती. ही साडी पश्चिम बंगालमध्ये बरीच प्रसिद्ध आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023 मध्ये सर्वसामान्य अर्थसंकल्प सादर करताना लाल रंगाची साडी नेसली होती. ही साडी कर्नाटकमधील धारवाड भागातील हाताने विणलेली इरकल रेशमी साडी होती.
2022 मध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान ओडिसाच्या हातकरघाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ब्राऊन रंगाची बोमकाई साडी नेसली होती. ही साडी सर्वसाधारणपणे ओडिसामध्ये तयार केली जाते.
2021 मधील अर्थसंकल्पात सीतारमण यांनी लाल आणि क्रीम पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी हैद्राबादमधील पोचमपल्ली गावातील आहे.
2021 चा अर्थसंकल्प खास होता. या वेळी पहिल्यांदा अर्थसंकल्पाची प्रत लाल रंगाच्या कव्हरमध्ये आणण्यात आली होती.
2020 मध्ये अर्थमंत्र्यांनी पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. आपल्या देशात पिवळा रंग शूभ मानला जातो.
2019 मध्ये निर्मला सीतारमण यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पादरम्यान गोल्डन बॉर्डरची गुलाबी मंगलगिरी साडी नेसली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world