Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प 2025-26 शनिवारी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी सकाळी 11 वाजता एनडीए सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 3.0 सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 8.30 वाजता नॉर्थ ब्लॉकसाठी त्यांचे निवासस्थान सोडतील. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट टीमसोबत राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींना सुपूर्द करतील. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्या मंत्रालयात परततील आणि सकाळी 9 वाजता नॉर्थ ब्लॉकच्या गेट क्रमांक 2 वर फोटोशूट होईल. त्यानंतर संसद भवन संकुलात सकाळी 10.15 ते 10.40 च्या सुमारास पीएम नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यात कॅबिनेटकडून अर्थसंकल्प मंजूर केला जाईल आणि तेथून अर्थमंत्री लोकसभेत पोहोचतील.
Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवन येथे दाखल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवन येथे दाखल
अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींना देणार
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर सादर होणार अर्थसंकल्प
Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं टीमसोबत अर्थमंत्रालयाबाहेर फोटोसेशन
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं टीमसोबत अर्थमंत्रालयाबाहेर फोटोसेशन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या निवासस्थानातून नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचल्या आहेत.
Live Updates of Union Budget 2025 : निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 'विकसित भारत' या उद्दिष्टांतर्गत मॅन्युफॅक्चर सेक्टरला बळकट करण्यावर सरकारचे मुख्य लक्ष असेल. याशिवाय मध्यमवर्गीयांना करात सवलत, आर्थिक समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
Live Updates of Union Budget 2025 : AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार?
AI मुळे मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते. बेरोजगारी वाढू शकते आणि त्यांचे वेतन घटू शकते. एआयमुळे होणाऱ्या बदलांमध्ये जे विपरित परिणाम होणार आहेत ते कमी कसे करता येतील याबाबत विचार होणे गरजेचे आहे, अशी चिंता आर्थिक सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
Economic Survey : किरकोळ महागाईमध्ये दिलासा
आर्थिक सर्वेक्षणानुसार, किरकोळ महागाई आर्थिक वर्ष 2024 मधील 5.4 टक्क्यांवरून एप्रिल-डिसेंबर 2024 मध्ये 4.9 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. रोजगार, स्वयंरोजगार आणि कामगार कल्याणाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
Economic Survey :आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे
- आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये भारताचा विकासदर 6.3 ते 6.8 टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.
- जीडीपीबाबतच्या पूर्वीच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये औद्योगिक वाढीचा दर 6.2 टक्के इतका राहिला होता.
- एप्रिल ते डिसेंबर 2024मध्ये महागाई दर 4.9 टक्के इतका होता.
- FY25 च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होईल असा अंदाज आहे.
Live Updates of Union Budget 2025 Women : महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या निधीची तरतूद?
सरकारने 2024-2025 च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावेळी सरकार या बजेटमध्ये वाढ करेल, अशी महिलांना आशा आहे.
Live Updates of Union Budget 2025 Farmer : किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा वाढण्याची शक्यता
सरकार MSP बाबतही घोषणा करू शकते. त्याचप्रमाणे, सरकार किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते.
Live Updates of Union Budget 2025 Farmer : पीएम किसान योजनाचा निधी वाढण्याची शक्यता
केंद्र सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा करू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करू शकते.