Union Budget 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी शनिवारी 31 जानेवारीला त्यांनी चालू आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडले. अर्थिक सर्वेक्षण अहवाल हा पुढील वर्षाच्या अर्थिक परिस्थितीची जाणीव करुन देणारा दस्तावेज असतो, त्यातून चिंताही व्यक्त केली जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महागाई, बेरोजरागारीतून सामान्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट NDTV मराठीच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यावेळी सोप्या शब्दात तुम्हाला अर्थसंकल्प समजून घेता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलावर्ग, शेतकरी आणि तरुणांना बजेटमधून काय मिळणार? हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आजच्या अर्थसंकल्पात उद्योग समूहांना काय मिळणार? महिलांसाठी कुठले मोठे निर्णय होणार हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थसंकल्पात कुठल्या नव्या योजना जाहीर होणार याकडेही अवघ्या देशाचं लक्ष आहे.
2014 पासून गेल्या 10 वर्षातली सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतून अर्थव्यवस्था जात आहे. जागतिकीकरणाचे फायदे आतापर्यंत आपण घेतले. आता त्याच जागतिकीकरणाचे तोटे भोगण्याची वेळ आली आहे. आर्थिक सर्वेक्षणातून पुढील वर्षीही आर्थिक विकासाचा दर चालू वर्षीपेक्षाही खाली जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या भाषणातून विकासदराला बुस्टर डोस देण्यासाठी काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. विकासाचा दर मंदावल्यावर अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल, तर नागरिकांच्या हाती पैसा राहणं आवश्यक असतं. त्यामुळे महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला करामध्ये सवलत अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पाची प्रत्येक अपडेट एक क्लिकवर वाचा - Union Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
तिकडे जागतिक पातळीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विविध विधानामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे भारतासह अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसतोय. पर्यावरणीय बदल, हरित उर्जा, आर्टिफिशअल इंटेलिजन्स या नवीन मुद्द्यांबाबतही अर्थसंकल्पातून काय भाष्य होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेवर नेमका काय आणि कसा परिणाम होणार हे तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठीनंही जय्यत तयारी केलीय, आज दिवसभर अर्थतज्ज्ञ, कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार यांची सर्वात विश्वसनीय टीम तुमच्या भेटीला येणार आहे.
नक्की वाचा - Economic Survey : आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर; GDP बाबत महत्त्वपूर्ण अंदाज आला समोर
सकाळी 9 वाजता - अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटची प्रत घेऊन अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनाकडे जातील.
सकाळी 10 वाजता - निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनातून संसदेकडे निघतील.
संसदेबाहेर अर्थसंकल्पाच्या डॉक्युमेंटसह माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर फोटोसेशन होईल.
सकाळी 11 वाजता - निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करतील
दुपारी 4 वाजता - अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world