जाहिरात

UPI Down : देशभरात UPI सेवा विस्कळीत, तुम्हालाही होतोय त्रास? 'या' पद्धतीनं करा व्यवहार

UPI Service Down : देशभरात आज UPI सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेट करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे

UPI Down : देशभरात UPI सेवा विस्कळीत, तुम्हालाही होतोय त्रास? 'या' पद्धतीनं करा व्यवहार
मुंबई:

UPI Service Down : देशभरात आज UPI सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेट करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. गगूल पे, फोन पे और पेटीएम (Google Pay, Paytm) सारखे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म नीट काम करत नाहीयत. त्यामुळे सर्वसामान्यांना पेमेंट देण्यास अडचणी येत आहेत. सध्या बहुतेक जण यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व व्यवहार करतात. रोख रक्कम जवळ कमी ठेवतात. त्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

UPI ची सेवा काही तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झाली आहे, अशी माहिती NPCI नं दिली आहे. गेल्या वर्षभरात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे. 

DownDetector नं दिलेल्या माहिकीनुसार 1.168 युझर्सनं याबाबत तक्रार केली आहे.  त्यामध्ये Google Pay चे 96 आणि Paytm च्या 23 युझर्सनी ही तक्रार केली आहे. याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार गेल्या दोन तासांपासून UPI सर्व्हिस डाऊन आहे. 

यामधील 66 टक्के युझर्सनी पेमेंट फेल झाल्याची तक्रार केली आहे. तर 34 टक्के युझर्सनी पैसे ट्रान्सफर करणे थांबल्याची तक्रार केली आहे. हा प्रकार एकाच बँकेपुरता मर्यादीत नसून अनेक बँकांना याचा फटका बसला आहे.

26 मार्च रोजी देखील बसला होता फटका

यापूर्वी 26 मार्च रोजी UPI ची सेवा ठप्प झाली होती. त्यावेळी जवळपास अडीच तास यूपीआयच्या माध्यमातून देशभर होणारे व्यवहार ठप्प झाले होते. त्या दिवशी  Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या बड्या अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे हे 'मिशन इम्पॉसिबल' बनले होते. 

काय आहेत पर्याय?

UPI डाऊन असेल तरी घाबरण्याची गरज नाही. तुमच्याकडे पेमेंट करण्याचे आणखी देखील पर्याय आहेत. त्यापैकी काही सोपे आणि विश्वासर्ह पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डेबिट/क्रेडिट कार्ड 

दुकानामधील POS मशिनवर कार्ड स्वाईप किंवा टॅप कराय. ऑनलाईन वेबसाईट्स किंवा अ‍ॅपवर कार्डचे डिटेल्स टाकून व्यवहार करा. 

नेट बँकिंग

तुम्ही बँकेच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरुन थेट पेमेंट करु शकता. ऑनलाईन शॉपिंग किंवा बिल पेमेंट करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत?

( नक्की वाचा : Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत )

मोबाइल वॉलेट्स (Wallet Apps)

Paytm, PhonePe Wallet, Mobikwik, Amazon Pay यामध्ये पूर्वी पैसे ठेवले असतील तर ते QR कोड स्कॅन करुन मोबाईल नंबरवर पाठवू शकता. 

चेक / डिमांड ड्राफ्ट

मोठी रक्कम किंवा व्यवहारामधील देवाण-घेवण करण्यासाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्टचा वापर देखील विश्वासर्ह आणि सुरक्षित आहे. 

कॅश (रोख रक्कम)

डिजिटल पेमेंट होत नसेल तर तुम्ही रोख रक्कम अदा करुन देखील तुमचा व्यवहार पूर्ण करु शकता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: