Share Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 2615 अंकांनी तर निफ्टीत 774 अंकांची वाढ

भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत असून, प्री-ओपन सत्रात निफ्टीने 24000 चा टप्पा ओलांडला आहे, तर सेन्सेक्समध्ये तब्बल 2500 अंकांची वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Share Market Today: मध्य पूर्वेतील युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबल्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.  भारतीय शेअर बाजाराने आज व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स, निफ्टीत तेजीत दिसत आहे. सेन्सेक्सची 2615 अंकांची तर निफ्टीची 774 अंकांची वाढ पाहायला मिळाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही बळकट

दरम्यान, रुपयाही बळकट होण्याची चिन्हे दर्शवत आहे. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये, डॉलरच्या तुलनेत रुपया ५० पैशांनी वधारला आणि ९२.५६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. वायदा बाजारात (Futures Market), कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ६ टक्क्यांची घसरण दिसून आली, ज्यामुळे बाजारात 'लोअर सर्किट' लागले.

Advertisement

(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)

कच्च्या तेलातही घसरण

शस्त्रसंधीमुळे आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याच्या बातमीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय 13% घसरण झाली. ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल सुमारे 95 डॉलर आहे, तर डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल 97.32 डॉलरवर आला. आरबीआय आज आपल्या पतधोरण बैठकीचे निर्णयही जाहीर करणार आहे. रेपो दरात वाढ होणार नाही अशी अपेक्षा आहे. याचाच परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

Topics mentioned in this article