आपल्या बाथरुममधील नळ सतत गळतात किंवा लवकर खराब होतात, ही ग्राहकांची मोठी तक्रार आता वॉटरटेकने दूर केली आहे. वॉटरटेक कंपनीने आपली नवी 'Prime Series' महाराष्ट्राच्या बाजारात उतरवली आहे.
या सिरीजचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे नळ 'DuraRite PTMT' पासून बनवलेले असून ते प्रचंड टिकाऊ आहेत. पुण्यात या उत्पादनांच्या अनावरणानंतर आता नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि सांगली यांसारख्या शहरांमध्येही हे नळ उपलब्ध होणार आहेत.
कंपनीने आधुनिक भारतीय घरांच्या गरजा आणि बजेटचा विचार करून सिलेक्ट, क्लासिक आणि रीगल अशा तीन आकर्षक रेंज सादर केल्या आहेत. "आम्ही ग्राहकांना व्हॅल्यू-फॉर-मनी आणि लीक-फ्री परफॉर्मन्स देण्याचा शब्द देतो," असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. वॉटरटेकचे देशभर 35 पेक्षा जास्त शाखांचे जाळे असून, आता महाराष्ट्रातील प्लंबर, डीलर आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही नवी सिरीज एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
'परफेक्ट फ्लो फॉर लाईफ' असे ब्रीदवाक्य असलेल्या या सिरीजमुळे बाथवेअर मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world