अनेकांना सेव्हिंग्स (Savings Account) आणि सॅलरी बँक (Salary Account) अकाऊंटबद्दल माहीत असेल. कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या उद्देशाने कंपनीकडून सॅलरी अकाऊंट उघडले जाते. कंपन्यांचे काही बँकांशी करार असतात. जिथे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाऊंट उघडतात. तर सेविंग्स अकाऊंटचा उद्देश बँकेत पैसे जमा करून बचत करणे हा आहे. यामुळे व्यक्तीला त्याच्या पैशांचे व्यवस्थापन करणे देखील सोपे होते. मात्र दोन्ही बँक अकाऊंटमध्ये नेमका काय फरक असतो, हे अनेकांना माहीत नसेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
किमान शिल्लक
साधारणपणे सॅलरी अकाऊंटमध्ये किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवण्याची अट नसते. त्यामुळे कर्मचारी आपल्या पगार खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतो. यामध्ये त्याला किमान शिल्लक मर्यादा किंवा दंडाची काळजी करण्याची गरज नाही.
मात्र बऱ्याच खाजगी बँकांमध्ये तुम्हाला सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये खात्यात काही किमान शिल्लक ठेवावी लागते. खात्यातील शिल्लक किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी असल्यास बँक खातेधारकावर दंड आकारू शकते.
(नक्की वाचा- SIP calculator: रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा)
सॅलरी अकाऊंटचं सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये रुपांतर
सॅलरी अकाऊंटमध्ये ठराविक कालावधीसाठी पगार येत नसेल, तर ते आपोआप नियमित सेविंग्स अकाऊंटमध्ये रूपांतरित होते. साधारणपणे हा कालावधी 3 महिन्यांचा असतो. एकदा ते नियमित सेविंग्स अकाऊंटमध्ये रूपांतरित झाल्यानंतर, खातेधारकाला बँकेच्या अटी व शर्तींनुसार किमान शिल्लक राखावी लागेल.
बँकेने मान्यता दिल्यास सेविंग्स अकाऊंट सॅलरी अकाऊंटमध्ये रूपांतर करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे बँकेत सेविंग्स अकाऊंट असेल आणि तुमच्या नवीन कंपनीचा त्याच बँकेशी करार असेल, तर नियमित सेविग्स अकाऊंट सॅलरी अकाऊंटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.
(नक्की वाचा- Larsen And Toubro: 90 तास काम करा सल्ला देणाऱ्या चेअरमनच्या कंपनीला 70 हजार कोटींचा झटका)
व्याज कुठे जास्त मिळते?
दोन्ही खात्यांवर व्याज उपलब्ध आहे. बहुतांश बँकांमध्ये सॅलरी आणि सेव्हिंग्स अकाऊंटवरील व्याजदर सारखाच असतो. मात्र बहुतेक बँका आता ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सॅलरी आणि सेव्हिंग्सअकाऊंटवर वेगवेगळे व्याजदर देतात. वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळे असू शकतात.