RBI Cancels PAYtm Bank License: केंद्रीय बँक आणि बँक रेग्युलेटर आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे. यासह पेटीएमच्या बँकिंग व्यवहारावर टाळं लागलं आहे. आज शुक्रवार २४ एप्रिल, २०२६ च्या सायंकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केल्याची माहिती दिली. २४ एप्रिल रोजी व्यवसाय संपताच पेटीएम बँकेवर तातडीने बँकिग उद्योगावर बंदी लावण्यात आली आहे. मात्र ही कारवाई अचानक झालेली नाही.
तुम्हाला आठवत असेल जेव्हा २०२२ मध्ये पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने कारवाई केली होती आणि मार्च २०२२ पासून नव्या ग्राहकांना जोडणं बंद करण्याचे आदेश दिले होते. जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये विद्यमान ग्राहक खाती, प्रीपेड साधने आणि वॉलेट्समधील पुढील ठेवी, जमा आणि टॉप-अप देखील निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून बँक आरबीआयच्या देखरेखेखाली आहे. बँकेचा सततचा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे.
परवाना रद्द करण्यामागील ही आहेत कारणं....
- रिझर्व्ह बँकेने वारंवार सूचना देऊनही पेटीएम पेमेंट्स बँकेने बँकिंग नियमांचं पालन केलं नाही. नियमांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आरबीआयने हे कठोर पाऊल उचलले.
- बँकेच्या हजारो खात्यांमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण नव्हती. एकाच पॅन कार्डवर शेकडो खाती उघडण्यात आली होती, ज्यामुळे मनी लाँड्रिंगचा धोका निर्माण झाला होता.
- बँकेने आरबीआयला सादर केलेल्या माहितीमध्ये पारदर्शकता नव्हती. अनेक वेळा चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याचे ऑडिटमध्ये समोर आले.
- बँकेच्या अंतर्गत व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी आढळल्या. प्रमोटर कंपनी आणि पेमेंट्स बँक यांच्यातील व्यवहारांमध्ये योग्य अंतर राखले गेले नव्हते, जे नियमांच्या विरोधात आहे.
- सततच्या तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे कठीण झाले होते. अनुपालन अहवालातील त्रुटींमुळे बँकेची विश्वासार्हता कमी झाली होती.
- ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट्स बँकेवर आहे, मुख्य 'पेटीएम ॲप'वर नाही. ज्यांचे पैसे आधीच वॉलेट किंवा खात्यात आहेत, ते आपले पैसे वापरू किंवा काढू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world