जाहिरात

Wine Shop Income : वाईन शॉपवाले बक्कळ कमाई करतात? सत्य वेगळंच; महिन्याची कमाई पाहून धक्काच बसेल!

दारूच्या दुकानातून एका महिन्याला १ कोटींची दारू विकली गेली तर दुकानदाराला किती नफा मिळतो? अंदाज लावणं कठीण...

Wine Shop Income : वाईन शॉपवाले बक्कळ कमाई करतात? सत्य वेगळंच; महिन्याची कमाई पाहून धक्काच बसेल!

Liquor Shop Earning : दारूचं दुकान चालविणारे चांगली कमाई करतात अशी सर्वसामान्यांची धारणा असते. कारण दारूची विक्री कायम तेजीत असते. मग हे दुकान शहरात असो वा कोणत्याही लहान वस्तीत. दारूची एक बाटली विकल्याने किती नफा होतो, सरकारकडून दारू विकणाऱ्यांना किती नफा मिळतो याबाबत जाणून घेऊया... 

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारुबाबत वेगवेगळे नियम आहेत आणि याअंतर्गत दारूची दुकाने वाटप केली जातात. हेच कारण आहे की, दोन वेगवेगळ्या जागांवर दोन दारूच्या दुकानांची विक्री एकसारखी झाली तरी त्यांचा नफा वेगवेगळा असू शकतो. कारण या व्यवसायात कमाई केवळ तु्म्ही किती विक्री करता यावर अवलंबून नसते. तुम्ही विकत असलेल्या दारूवर किती चांगले नियंत्रण ठेवता यावर हे अवलंबून आहे. कारण दारूचा परवाना एका निश्चित काळासाठी मिळतो आणि यादरम्यान जितकी आणि ज्या प्रकारची दारू विकली जाते, त्यानुसार मार्जिन आणि नफा मिळतो. 

ठिकाण कोणतं यावरही दारूची कमाई अवलंबून...

दारूच्या दुकानाची कमाई चार मु्ख्य गोष्टींवर अवलंबून असते. ठिकाण, ग्राहकांची संख्या, राज्याचे नियम  आणि दुकानाचे व्यवस्थापन. छोट्याशा शहरात किंवा उपनगरात दारूच्या दुकानातून एका महिन्यातून तब्बल १० ते २५ लाख रुपयांची दारू विकली जात असेल तर नफ्याचं मार्जिन ५ ते ८ टक्क्यांपर्यंत होऊ शकतो. अशात दुकानदाराला ५० हजार ते दीड लाख महिन्याची कमाई होऊ शकते. 

जर दारूचं दुकान एका शहराच्या प्रमुख जागेत असल्यास फायदा अधिक होऊ शकतो. दुकानाची महिन्याची विक्री ३० ते ७० लाख असेल तर विकणाऱ्या दारुच्या ब्रँडनुसार मार्जिन ६ ते १० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. अशात शहरात चालविल्या जाणाऱ्या दुकानात महिनाभराची कमाई २ ते ५ लाखांपर्यंत पोहोचू शकते. 

नक्की वाचा - MBBS केल्यानंतर सर्वाधिक सॅलरी कोणत्या डॉक्टरांना मिळते? वर्षाची कमाई पाहून धक्काच बसेल!

तर दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये किंवा टूरिस्ट स्पॉटवर हे दुकान असेल. उदा. मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू, दिल्ली आदी ठिकाणी दारूचं एक दुकान १ कोटी किंवा त्याहून अधिक विक्री एका महिन्यात करू शकतो. अशा दुकानात जे ब्रँड आणि प्रॉडक्ट विकले जातात त्यावर ८ ते १२ टक्के मार्जिन मिळू शकतं. यातून महिन्याला ६ ते १२ लाखांपर्यंत नफा मिळू शकतो. 

वेगवेगळ्या शहरांनुसार मार्जिन बदलले...

दारूच्या दुकानाचा व्यवसाय चांगला नफा देणारा व्यवसाय नाही. प्रत्यक्षात हा जास्त विक्रीचा, कमी नफ्याचा व्यवसाय आहे. दारूच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट आणि ब्रँडवर वेगवेगळं मार्जिन म्हणजे कमिशन दुकानदारांना मिळतं. बियरवर जिथं ३ ते ६ टक्क्यांपर्यंत लाभ मिळतो, तर आयएमएफएळ म्हणजे व्हिस्की, व्होडका, रमवर ६ ते १० टक्के, प्रीमियन आणि इम्पोर्टेंड दारूवर १० ते १८ टक्के याशिवाय वाइनवर १० ते २० टक्के लाभ मिळू शकतो. 

अधिकांश दुकानांतील सर्व प्रॉडक्ट मिळून मार्जिन जवळपास ६ ते ९ टक्के असते. त्यामुळे जर तुमचं दुकान एका महिन्यात ५० लाख रुपय़ांची विक्री करीत असेल तर त्यामुळे खर्चापूर्वी तुमचा एकूण नफा सुमारे ३-४ लाख रुपये असू शकतो. 

दारूच्या व्यवसायाबद्दल बहुतेक लोकांना माहीत नसलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे, दुकानदार दारूवर मिळणारा नफा थेट घरी घेऊन जात नाहीत. यामधून तुम्हाला भाडं, कर्मचाऱ्यांचा पगार, विजेचं बिल, बाटल्या तुटणे किंवा दारू वाया जाणे, स्टॉकमधील ज्या मालाची विक्री कमी होते किंवा ज्याची विक्री कमी होते, त्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात.

दारूचं दुकान सुरू करणं फायद्याचं नाही, कारण यात फार मोठी कमाई होत नाही. जर कमी मार्जिन मिळणाऱ्या दारू जास्त विकल्या जात असतील तर कमाई खूप जास्त होत नाही आणि जास्त मार्जिन देणारी दारू तर व्यवस्थित विकली जात असेल तर कमाई चांगली होऊ शकते. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com