इस्त्रायलच्या मदतीला भारत धावणार आहे. त्यामुळे इस्त्रायलमध्ये भारतीयांना जवळपास 10,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिल्या फेरीत महाराष्ट्रातून ही भरती केली जाणार आहे. सध्या इस्त्रायलमध्ये कामगारांचा मोठा तुटवडा आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा इस्रायलला फटका बसतो आहे. त्यामुळे मनुष्यबळासाठी इस्रायलने भारताची मदत मागितली आहे. त्यामुळे भारतातून इस्रायलला मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून दहा हजार कामगार पाठवले जाणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इस्रायलचे हमासबरोबर सध्या युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेतील कौशल्याची कमतरता आहे. ही दूर करण्यासाठी इस्रायलने भारताकडे मदत मागितली आहे. इस्रायल भारतातून 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 काळजीवाहकांची नियुक्ती करणार आहे. मात्र या नोकऱ्या अशा उमेदवारांना मिळणार आहे जे निकष आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले असतील. इस्रायलची लोकसंख्या, इमिग्रेशन आणि बॉर्डर ऑथॉरिटी (PIBA) ने बांधकाम कामगारांसाठी चार कामांसाठी मनुष्यबळाची मागणी केली आहे. त्यात फ्रेमवर्क, लोखंडी कामकाज, प्लास्टरिंग आणि सिरेमिक टाइलिंग येणाऱ्या लोकांची मागणी केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
इस्रायलच्या PIBA ची एक टीम भारतात भेट देणार आहे. यावेळी ते कौशल्य मुल्यांकन करतील. त्यानंतर निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीही निवड करतील. त्यानंतर या कामगारांना इस्रायलमध्ये काम करता येणार आहे. बांधकाम कामगारांची ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. भारताच्या या मदतीमुळे इस्रायलला मनुष्यबळ मिळणार आहे. तर भारतीयांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world