जाहिरात

गिरनारमध्ये 11 वर्षांच्या मुलावर हल्ला; स्थानिकांसह पर्यटकांमध्ये घबराट, गीरचे सिंह नरभक्षक का होत आहेत?

गेल्या काही काळापासून सिंहांकडून नागरिकांवर हल्ला केला जात असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांसह गिरनारमधील पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

गिरनारमध्ये 11 वर्षांच्या मुलावर हल्ला; स्थानिकांसह पर्यटकांमध्ये घबराट, गीरचे सिंह नरभक्षक का होत आहेत?

lions in Girnar becoming man-eaters? : 'गीर' हे भारतातील सिंहाचं एकमेव निवासस्थान आहे. भावनगर, अमरेली, जुनागढ आणि गीर या भागात प्रामुख्याने सिंहांचा वावर असतो. स्थानिक आणि सिंह एकत्रितपणे या परिसरात राहत असल्याचं पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून सिंहांकडून नागरिकांवर हल्ला केला जात असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांसह गिरनारमधील पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

गिरनारमधील ११ वर्षीय मुलाचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू

गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात येणाऱ्या पवित्र गिरनार पर्वतावर शनिवारी सकाळी मोठी घटना घडली आहे. येथे एक कुटुंब अंबाजी माताच्या दर्शनासाठी पर्वतावरील शिड्या चढत होत्या. यादरम्यान ११ वर्षीय एका मुलगा शिड्यांवर बसला होता. त्यादरम्यान अचानक एक सिंह गर्दीतून त्याला उचलून घनदाट जंगलात घेऊन गेला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण गिरनार भागात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर भाविकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मुलाचं नाव मयूर चव्हाण आहे. तो आपल्या कुटुंबासह गिरनार पर्वतावर अंबाजी माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. 

ही घटना शनिवारी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी घडली. रिमझिम पाऊस सुरू होता. यादरम्यान भाविक माताचा जयजयकार करीत गिरनारच्या पायऱ्या चढत होते. ५० व्या शिड्याजवळ शेकडो भाविकांदरम्यान अचानक सिंहाने मुलावर हल्ला केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून या भागात तीन सिंह वावरताना दिसत आहेत. घटनास्थळाहून तब्बल १०० मीटर दूर पायऱ्यांजवळ मुलाच्या पायाचे अवशेष सापडले. वन विभागाने सिंहाच्या पायाचे निशाण, ओढल्याच्या खुणा आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

आतापर्यंत माणूस आणि सिंह एकत्र आनंदाने नांदत होते. मात्र अचानक सौराष्ट्रमधील सिंह नरभक्षक का होत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. 

गिरमधील माणसाळलेले सिंह त्यांच्यावर हल्ला का करीत आहेत? 

गिर क्षेत्र हे आशियाई सिंहांसाठी एकमेव सुरक्षित वनक्षेत्र आहे.  १९६० च्या दशकापर्यंत केवळ २५ ते ३० आशियाई सिंह शिल्लक होते. १९७२ मध्ये गिरमध्ये सिंहासाठी वनक्षेत्र तयार करण्यात आलं. येथे सिंह बंदिस्त नसतात तर ते जंगलात मोकळेपणाने फिरतात. या जंगलात काही मेंढपाळ्यांची कुटुंबही राहतात. हे सिंहांना घाबरत नाही, तर सिंहदेखील त्यांच्यावर हल्ला करीत नाही. मात्र गिरचे शेर माणसांवर हल्ला करीत असल्याने तज्ज्ञदेखील हैराण झाले आहे. सध्या गिरमध्ये ९०० सिंहांचा वावर आहे. त्यामुळे प्रत्येक सिंहाच्या प्रदेशाची व्याप्ती कमी झाली आहे. प्रदेश कमी झाल्याने सिंहांमधील संघर्ष वाढला आहे. संघर्षामुळे सिंह तणाव आणि आजारी पडत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातही बेबिसिया नावाच्या आजारामुळे सिंह चिडचिडे होतात. चिडचिडे झालेले सिंह जेव्हा वनाच्या बाहेर येतात तेव्हा घाबरुन ते हल्ला करीत असल्याचं म्हटलं जातं. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com