जाहिरात

30 वर्ष जुनं रहस्य! काय आहे एव्हरेस्टवरील 'ग्रीन बुट्स'; तो खाली आणण्यासाठी का केला जातोय धोकादायक प्रयत्न?

जर सर्व काही ठरविल्यानुसार झालं तर वर्षानुवर्षे बर्फात गाडलेली ही कहाणी लवकर नव्या वळणावर जाऊ शकते आणि बऱ्याच काळापासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समोर येऊ शकतात. 

30 वर्ष जुनं रहस्य! काय आहे एव्हरेस्टवरील 'ग्रीन बुट्स'; तो खाली आणण्यासाठी का केला जातोय धोकादायक प्रयत्न?

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हा केवळ साहस आणि शौर्याच्या कथांसाठी नाही तर लपलेल्या अनेक रहस्यांसाठीही ओळखला जातो. अशाच रहस्यांमध्ये एक नाव आहे ग्रीन बुट्स.. ज्याने जवळपास तीन दशकांपासून गिर्यारोहकांची उत्सुकता जिवंत ठेवली. उंचच उंच बर्फाने आच्छादलेल्या डोंगरात एक रहस्यमयी मृतदेह एवरेस्टमधील एक ओळख बनला आहे. हजारो गिर्यारोहक या मृतदेहाच्या जवळून गेले आहेत, परंतु त्याची कहाणी नेहमीच गूढतेने वेढलेली राहिली आहे. आता एक नवीन रहस्य समोर आलं असून, ज्याने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जर सर्व काही ठरविल्यानुसार झालं तर वर्षानुवर्षे बर्फात गाडलेली ही कहाणी लवकर नव्या वळणावर जाऊ शकते आणि बऱ्याच काळापासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समोर येऊ शकतात. 

भारत-तिबेट सीमा पोलिसांनी एव्हरेस्टच्या उत्तरेकडील उतारावरुन ग्रीन बुट्सचा मृतदेह काढण्यासाठी विशेष एजन्सींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. निविदेनुसार, ऑक्टोबरपर्यंत मृतदेह दिल्लीला पोहोचवण्याचं लक्ष्य आहे. मात्र, अनुभवी गिर्यारोहक आणि मोहीम प्रमुख त्शेरिंग जांगबू शेर्पा यांच्या मते ही मोहीम नेहमीच्या एव्हरेस्ट चढाईपेक्षा दुप्पट धोकादायक असेल.

एक आठवड्यापर्यंत चालू शकतं ऑपरेशन...

शेरपाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १० प्रशिक्षित गिर्यारोहकांच्या टीमची या अभियानासाठी गरज आहे आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. त्यांनी सांगितलं की, एव्हरेस्टच्या उंच पर्वतांवर हवामान अनपेक्षित असतं. यासाठी वसंत ऋतूपूर्वी अशा प्रकारचं अभियान चालवणं अशक्य असल्याचं मानलं जातं. याच कारणामुळे जून ते ऑक्टोबरच्या या निवडलेल्या कालावधीवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. 

ग्रीन बुट्सचं नाव का पडलं?

या मृतदेहाची ओळख त्याच्या गडद हिरव्या रंगाच्या गिर्यारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या बुटांमुळे झाली आहे. तब्बल २७,००० फुटाच्या उंचीवरील हे मृतदेह वर्षांपासून तिबेट मार्गावरुन एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहणासाठी एक ओळख बनली आहे. अनेक गिर्यारोहक बेस कॅम्पला ग्रीन बुट्सजवळ असल्याचं सांगून आपलं लोकेशन सांगतात. 

'डेथ झोन'मध्ये सापडला रहस्यमयी मृतदेह

'ग्रीन बूट्स' हा मृतदेह 'डेथ झोन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे. हा प्रदेश २६,२०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. येथे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असते. अशा उंचीवर जास्त काळ राहणं जीवघेणं ठरू शकतं.  त्यामुळे मृतदेह खाली आणणं अत्यंत धोकादायक मानलं जातं.

या रहस्याचा १९९६ च्या दुर्घटनेशी संबंध...

बऱ्याच काळापासून असा विश्वास होता की 'ग्रीन बूट्स'मधील मृतदेह २८ वर्षीय आयटीबीपी सैनिक त्सेवांग पालजोर यांचा होता. १० मे १९९६ रोजी ते आपल्या टीमसोबत एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. शिखराजवळ अचानक आलेल्या भीषण वादळाला न जुमानता, तीन गिर्यारोहक पुढे जात राहिले पण ते कधीच परतले नाहीत.

डीएनए चाचणीने संपूर्ण कहाणी बदलली

मात्र, अलीकडील कागदपत्रे आणि अहवालांनी या कहाणीला एक नवीन वळण दिलं आहे. आयटीबीपीच्या निविदा कागदपत्रांनुसार 'ग्रीन बूट्स'मधील मृतदेह भारतीय सैनिक दोर्जे मोरुप यांचा आहे. जे त्याच मोहिमेचा भाग होते. वृत्तानुसार, डीएनए चाचणीनुसार, तो मृतदेह त्सेवांग पाल्जोर यांचा नसून दोर्जे मोरुप यांचा होता.

तीन दशके जुने गूढ अखेर उलगडेल का?

जर ही धोकादायक मोहीम यशस्वी झाली, तर एव्हरेस्टच्या सर्वात प्रसिद्ध रहस्यांपैकी एक कायमचं मिटू शकतं. तसेच, १९९६ च्या दुःखद गिर्यारोहण दुर्घटनेशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरेही मिळू शकतात.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com