ओडिशात 24 तासात उष्माघातामुळे 45 जणांचा मृत्यू? देशाचा आकडा 211 वर  

रविवारी देशभरात उष्माघातामुळे मृतांची संख्या 211 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या ओडिशात 141 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
भुवनेश्वर:

देशभरात संशयास्पद उष्माघाताचा मृत्यूंचा आकडा 200 पार गेला आहे. ओडिशात 24 तासात 45 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने रविवारी सांगितलं की, येत्या तीन दिवसात उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात उष्माघाताची तीव्रता कमी होईल. गेल्या 24 तासात ओडिशात 45 मृत्यू आणि बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात संशयास्पद उष्माघातामुळे निवडणुकीच्या ड्यूटीवर तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. त्यामुळे रविवारी देशभरात उष्माघातामुळे मृतांची संख्या 211 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या ओडिशात 141 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ओडिशा सरकारने सांगितलं की, गेल्या 24 तासात 45 मृत्यू झालेल्यांपैकी पोस्टमार्टम तपासानुसार 26 जणांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं समोर आलं आहे. तर सरकारने अन्य मृतांमागे उष्माघाताव्यतिरिक्त अन्य गोष्टी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. इतर 107 जणांचा मृत्यू का झाला याचा शोध सुरू आहे. 

बातमी अपडेट होत आहे.