UP Crime News : मेरठमधील साहिल-मुस्कान प्रकरण लोकांच्या आठवणीत असताना अशाचा प्रकारचं क्रूर प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये प्रेमात वेड्या झालेल्या 50 वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. महिला पतीच्या हत्या करून थांबली नाही तर मृतदेहाचे सहा तुकडे देखील केले. नंतर ते नदीकाठी फेकून दिले. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरासह चौघांना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपी मायादेवी ही बलिया पोलीस स्टेशन परिसरातील बहादुरपूरची रहिवासी आहे. तिचे दुसऱ्या एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. यातून तिने आपल्या पतीची हत्या केली. या प्रकरणी माया देवीसह तिचा प्रियकर अनिल यादव आणि प्रियकराचे दोन मित्र सतीश यादव आणि ड्रायव्हर मिथिलेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. माया देवीने नवऱ्याची हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पती देवेंद्र कुमारची हरवल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया देवीने 10 मे रोजी बलिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवेंद्र कुमार मुलीला आणण्यासाठी बिहारच्या बक्सर रेल्वे स्टेशनवर गेले होते. ते अजून परतलेला नाही. त्याचा मोबाईलही बंद आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेपत्ता देवेंद्र कुमार यांचा शोध सुरू केला.
(नक्की वाचा- Akola News : मॅट्रिमोनियल साईटवर भेट; लग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार)
दरम्यान, 10 मे रोजी सिकंदरपूर पोलीस स्टेशन परिसरातील खारिद येथील दियारी गावात एका व्यक्तीचे कापलेले हात आणि पाय आढळले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला आणि 12 मे रोजी त्याच दियारापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत एक धड आढळून आले. पोलिसांनी धडाची ओळख पटवली, तेव्हा ते देवेंद्र कुमार यांचे असल्याचे समजले. पोलिसांनी शीर असून सापडले नसून त्याचा शोध सुरु आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी तपासादरम्यान मायाची कठोर चौकशी केली, ज्यामध्ये संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
(नक्की वाचा :तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा महागात पडला; उदयपूरच्या मार्बल व्यापार्यांनी 5000 कोटींचे व्यवहार मोडले)
बलियाचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितलं की, अटक केलेल्या आरोपींनी सांगितले की त्यांनी देवेंद्रचे शीर घाघरा नदीत फेकले होते. मृत देवेंद् कुमार यांच्या मुलीने बलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिची आई माया देवी, तिचा प्रियकर अनिल यादव आणि त्याचे मित्र सतीश आणि बोलेरो गाडीचा चालक मिथलेश पटेल यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.