उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेशी लग्न केले. मात्र लग्नाच्या रात्रीनंतर लगेचच वृद्धाचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जौनपूरच्या गौराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुछमुछ गावातील आहे. येथील रहिवासी असलेले संगरू राम (75) यांच्या पहिल्या पत्नीचे निधन एक वर्षापूर्वी झाले होते. त्यांना मुलं-बाळं नव्हते आणि ते एकटेच शेतीची कामे सांभाळत होते. कुटुंबातील सदस्यांनी संगरू राम यांना दुसरे लग्न न करण्याचा सल्ला दिला होता, पण संगरू राम यांनी कोणाचेही ऐकले नाही.
(नक्की वाचा- Dombivli News: डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू)
अखेरीस, 29 सप्टेंबर रोजी त्यांनी जलालपूर परिसरातील मनभावती (35) या महिलेशी आधी कोर्टात आणि नंतर मंदिरात सात फेरे घेतले. मात्र त्यांचा आनंदाचा हा क्षण फार काळ टिकला नाही. लग्नाच्या रात्री या दोघांनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक संगरू राम यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मनभावतीसाठी लग्नाचा हा आनंद क्षणार्धात दुःखात बदलला. संपूर्ण गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर गावात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कुणी याला नशिबाचा खेळ म्हणत आहे, तर काही लोक या घटनेला संशयास्पद मानत आहेत.
(नक्की वाचा- VIDEO: सोलापूरकरांच्या मदतीला धावली बॉलिवूड अभिनेत्री! पूरग्रस्तांना पाठवलं ट्रक भरून सामान)
या संगरू राम यांच्या भाच्यांमुळे वेगळ वळण आलं आहे. जेव्हा संगरू राम यांच्या दिल्लीत राहणाऱ्या भाच्यांना माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी गावात येऊन अंत्यसंस्कार थांबवले. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार का आणि पोस्टमॉर्टम केले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.