पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; लाल किल्ल्यावर पुन्हा रचला इतिहास!

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केलं.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारत आज 78 वा स्वातंत्र्याचा (78th independence day) उत्सव साजरा करीत आहे. पंतप्रधान मोदींनी आज अकराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. लाल किल्ल्याच्या प्राचीरमधून मोदींनी विकसित भारत @2024 चा रोड मॅप समोर ठेवला. मोदींनी आपल्या 98 मिनिटांच्या भाषणात भारत पाहत असलेल्या स्वप्नांचं चित्र दाखवलं आणि दुसरीकडे युद्ध लढण्याच्या तयारीत असलेल्या जगातील अनेक देशांना बुद्धांचा संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा एकदाही उल्लेख केला नाही. मात्र त्यांनी बांगलादेशाचा उल्लेख केला आणि लवकरच देश त्यातून बाहेर येईल असा विश्वास व्यक्त करताना मदतीसाठी तत्परता दाखवली. 

पंतप्रधान मोदींनी कलकत्ता डॉक्टर हत्याकांडाचा उल्लेख करताना महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींच्या मनात भीती निर्माण व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी पुढील पाच वर्षात 75 हजार मेडिकल जागांचा विश्वास व्यक्त केला. 

नक्की वाचा - 'आपला देश बुद्धांचा, युद्ध आपला मार्ग नाही'; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा संदेश

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केलं. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणाचा रेकॉर्ड तोडलाय. 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन आज तब्बल 97 मिनिटं भाषण केलं त्यामुळे मोदींनी लाल किल्ल्यावरून आतापर्यंत केलेल्या भाषणाचा रेकॉर्ड तोडलाय. 2015 साली पंतप्रधान मोदी यांनी 86 मिनिटांचं भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता. पण आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीच्या फक्त एका वेळीच एका तासापेक्षा कमी वेळचे भाषण केले आहे. 

मोदींच्या भाषणाची वेळ - 

2014 - 65 मिनिटं 
2015 - 86 मिनिटं 
2016 - 94 मिनिटं 
2017 - 55 मिनिटं 
2018 - 82 मिनिटं
2019 - 92 मिनिटं 
2020 - 90 मिनिटं 
2021 - 88 मिनिटं 
2022 - 83 मिनिटं 
2023 - 89 मिनिटं 
2024 - 97 मिनिटं

Advertisement