आज देशाचा 78 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 11 व्यांदा 15 ऑगस्ट रोजी देशाला संबोधित करीत आहेत.78 व्या स्वातंत्र्य (78th Independence Day LIVE) दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर महात्मा गांधींना पुष्प अर्पण केलं. याशिवाय पंतप्रधान मोदींनी संबोधनात शेतकरी आणि तरुणांचा उल्लेख केला.
लाल किल्ल्यावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा अर्थ काय घ्यायचा?
Independence Day : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा अर्थ काय घ्यायचा? | NDTV Explainer#IndependenceDay2024 #NarendraModi #ndtvmarathi @sanjaypugalia pic.twitter.com/etJvsxC7CM
— NDTV Marathi (@NDTVMarathi) August 15, 2024
लवकरच बांगलादेश विकासाच्या मार्गावर चालेल, शेजारील देशाला मोदींनी दिलं मदतीचं वचन
बांगलादेशात जे काही झालं, त्यावरून शेजारी देशांनी चिंता व्यक्त करणं साहजिक आहे. लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा महत्त्वाची आहे. शेजारी देशात सुख आणि शांती राहावी अशी आमची इच्छा आहे. लवकरच बांगलादेश विकासाच्या मार्गावर चालेल अशी अपेक्षा आहे.
दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
सदनाचे निवासी आयुक्त रूपेंदर सिंह, सहाय्यक आयुक्त संपर्क राजेश आडपवार, सहाय्यक आयुक्त राजशिष्टाचार व सुरक्षा स्मीता शेलार, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम, निवासी अभियंता जे पी गंगवार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागणार नाही - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तरुणांना नवं वचन दिलं. ते म्हणाले की, आता आपल्या मध्यमवर्गीय ततरुणांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागणार नाही. पुढील पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येतील - मोदी
देशांच्या लेकींवर अत्याचार होतोय, दोषींमध्ये भीती निर्माण व्हायला हवी - मोदी
पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून महिलांविरोधात बलात्काराच्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. राज्य सरकारने महिला होणारे गुन्हे गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, मुलींवर अत्याचार होत आहेत. दोषींमध्ये भीती निर्माण करणं गरजेचं आहे. - मोदी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारत-पाक जवानांकडून दिमाखदार संचलन
स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येला अटारी- वाघा सीमेवर विशेष सलामीचा कार्यक्रम सुरु आहे.
अटारी बॉर्डरवर खास परेड सुरू आहे. अटारी सीमेवर रंगला बीटिंग द रिट्रीट सोहळा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारत-पाक जवानांकडून दिमाखदार संचलन. पर्यटकांचीही सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थिती
लाडकी बहीण योजनेच दोन दिवस आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिला लाभार्थींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव जावळी खटाव आणि खंडाळा तालुक्यातील महिलांच्या अकाउंट वर दोन दिवस आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केले जात आहे. वाठार स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या महिलेच्या अकाउंटवर दोन महिन्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलेने समाधान व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 9:05 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार आहे
शिवसेना भवनात ध्वजारोहण सोहळा...
शिवसेना सेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून साधारण 9 पर्यंत ध्वजारोहणाचा हा सोहळा पार पडेल.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते तर तरुणांचा ऊर अभिमानाने भरून येतो - मोदी
कोरोना काळातील संकटाला विसरता येऊ शकत नाही. येथे दहशतवादी हल्ले करतात तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राइक केली जाते. एअरस्ट्राइक केल्यानंतर तरुणांचा ऊर अभिमानाने भरून येतो. - मोदी
गेल्या काही वर्षात भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे - मोदी
आम्ही बँकिग क्षेत्रात सुधारणा आणली आहे. तरुणांना नवीन संधी उपलब्ध होत आहे. गेल्या काही वर्षात भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे - मोदी
प्रत्येक व्यक्ती 2047 च्या विकसित भारतातील प्रयत्न करीत करतेय - मोदी
2047 केवळ शब्द नाहीत. यामागे कठोर परिश्रम सुरू आहे. यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत. यासाठी लोकांनी अगणित सूचना दिल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाचं स्वप्नाचं प्रतिबिंब त्याच दिसून येत आहे. तरुण असो... ज्येष्ठ असो.. ग्रामीण भागातील लोक असो वा शहरातील. शेतकरी, आदिवासी, दलित, महिला... प्रत्येक व्यक्ती 2047 च्या विकसित भारतातील प्रयत्न करीत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदी म्हणाले...
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदी म्हणाले...
12 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी पुरविण्यात आलं.स्वच्छ भारत मोहीम घराघरांत पोहोचवली
अडीच कोटी लोकांच्या घरात वीज पोहोचली
सैन्याने एअर स्ट्राईक केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
#IndependenceDay2024 | PM Modi at Red Fort, says, "We are proud that we carry the blood of the 40 crore people who had uprooted the colonial rule from India...Today, we are 140 crore people, if we resolve and move together in one direction, then we can become 'Viksit Bharat' by… pic.twitter.com/b5njnZsYLM
— ANI (@ANI) August 15, 2024
विकसित भारत, समृद्ध भारत हेच लक्ष्य असून विकसित भारतासाठी कठोर प्रयत्न सुरू आहेत - नरेंद्र मोदी
विकसित भारत, समृद्ध भारत हेच लक्ष्य असून विकसित भारतासाठी कठोर प्रयत्न सुरू आहेत - नरेंद्र मोदी
140 कोटी नागरिक देशाला समृद्ध बनवू शकतात - नरेंद्र मोदी
40 कोटी देशवासी जर भारताना स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात, तर 140 कोटी नागरिक देशाला समृद्ध बनवू शकतात - नरेंद्र मोदी