साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतुट नाते आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा उल्लेख नेहमीच होत असतो. शिवाय राजकारण्याचा साहित्य संमेलनाशी संबंध काय असा प्रश्नही यानिमित्ताने नेहमीच विचारला गेला आहे. त्यावरून वाद ही झाले आहेत. मात्र या वादावरून 98 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पडदा उठवला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी शरद पवारांनी याबाबत भाष्यकरत आपली भूमीका मांडली आहे. यावेळी संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साहित्य संमेलन म्हटलं की इतर गोष्टींची चर्चा नेहमीच सुरू होते असं शरद पवार यावेळी म्हणाले. त्यात नेहमीचाच विषय असतो, तो म्हणजे राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? यावर संमेलना आधी लिखाण ही केलं जातं. टीका ही होते. काही जण समिक्षा ही करतात. मात्र आपलं याबाबत स्वच्छ मत आहे. ते म्हणजे यावर वाद कशाला करायचा? लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांनी या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली.
ट्रेंडिंग बातमी - ABMSS: महाराष्ट्राबाहेर कुठे कुठे झाली अ. भा. मराठी साहित्य संमेलनं? पाहा यादी
महाराष्ट्राचा इतिहास पाहीला तर कलेला राजांनी ही राजाश्रय दिला होता. छत्रपती संभाजी महाराज हे त्याचे बोलकं उदाहरण आहे असं ही यावेळी शरद पवार म्हणाले. राजकारणी तर साहित्य क्षेत्रात आलेच, पण अनेक साहित्यिकांनीही राजकारणाच्या आखाड्यात आपलं नशिब आजमावलं आहे. रा. धो. महानोर, लक्ष्मण माने यांचा उल्लेख या निमित्ताने शरद पवारांनी आवर्जून केला. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांची फारकत होऊ शकत नाही. ते एकमेकांना पूरक असू शकतात असं ही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवर्जून आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असं पवार म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी मराठी भाषेचे विषुद्धीकरण सध्या होत असल्याचे सांगितले. ते टाळणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले. या साहित्य संमेलनाचा सर्व मराठीजनांनी आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.