जाहिरात

ABMSS News : आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात, कसा असेल कार्यक्रम?

देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.

ABMSS News : आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात, कसा असेल कार्यक्रम?
नवी दिल्ली:

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. आजपासून या साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. 21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर  या भूषवणार आहेत.

देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. तर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटन सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संमेलनाच्या पहिल्या दिवशी काय काय? 

21 फेब्रुवारी हा संमेलनाचा पहिला दिवस असणार आहे.  सकाळी 9.30 ते 11.00 या कालावधीत ग्रंथ दिंडी आणि ध्वजारोहण होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात हा कार्यक्रम होईल. प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीला प्रारंभ होईल. दुपारी साडे तीन वाजता मुख्य उद्घाटन समारंभ पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार, प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भावळकर उपस्थित असतील. हा कार्यक्रम विज्ञान भवनात पार पडेल. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

दिवस पहिला सत्र दुसरे 

साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसरे सत्र हे संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत असेले. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे असतील. यावेळी मंत्री उदय सामंत, आशिष शेलार उपस्थित असतील. शिवाय पूर्वाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे हे ही हजर असतील. यावेळी 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण याच सत्रात होईल. त्यानंतर संध्याकाळी 7.30 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत निमंत्रिताचे कवी संमेलन पार पडेल. या संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव असतील. 

ट्रेंडिंग बातमी - Marathi language issue: 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?, मला मराठी येत नाही, जा माझी...'

संमेलनाचा दुसरा दिवस 

साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 फेब्रुवारीला कवी कट्टा रंगेल. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कवी कट्टा रंगेल. शिवाय संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजता कवी कट्ट्याचे दुसरे सत्र रंगेल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात मराठी पाऊल पडते पुढे ही मुलाखत रंगेल. सकाळी 10  ते 12 वाजेपर्यंत ती असेल. दुपारी 12 ते 2  वाजता परिसंवाद असणार आहे. मनमोकळा संवाद- मराठीचा अमराठी संसार हा या परिसंवादाचा विषय आहे. त्यानंत विशेष सत्कार असतील. अडीच ते चार काळात लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी हे सादर होणार आहे. पुढे राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब हा परिसंवाद होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता मधुरव कार्यक्रम होईल तो मधुरा वेलणकर सादर करणार आहेत. बहुभाषीक कवी संमेलन, आनंदी गोपाळ परिचर्चा, शिवाय बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित हा परिसंवादही याच दिवशी पार पडणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी काय काय? 

असे घडलो आम्ही या विषयावर मुलखत होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ही मुलाखत होईल. यात पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू आणि निलम गोऱ्हे सहभागी होणार आहेत. ही मुलाखत सकाळी 10 ते 12 या वेळात होईल.  सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य या विषयावर 12 वाजता परिसंवाद होईल. त्यानंतर नाते दिल्लीशी मराठीचे हा परिसंवाद होणार आहे. हा दुपारी अडीच वाजता होईल. या परिसंवादात ज्योतिरादित्य शिंदे, शिवेंद्रराजे भोसले आणि भूषणराजे होळकर सहभागी होती.  मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म या विषयावरही परिसंवाद होईल. हा परिसंवाद संध्याकाळी साडेपाच वाजता पार पडेल. अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठी, कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलता  या विषयावही परिसंवाद तिसऱ्या दिवशी होईल. 

ट्रेंडिंग बातमी -  27 KG सोनं, 1116 KG चांदी... जयललिता यांची संपत्ती तमिळनाडू सरकारच्या तिजोरीत, यादी पाहून डोळे विस्फारतील!

शेवटच्या सत्रात समारोप 

डॉ. बाबासाहेबा आंबेडकर सभामंडपात खुले अधिवेशन आणि संमेलनाचा समारोप होणार आहे. संध्याकाळी साडेचारा ते आठ वाजेपर्यंत हा समारोप कार्यक्रम होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विजय दर्डा, उदय सामंत, पी.डी. पाटील उपस्थित राहाणार आहेत. सिवाय यावेळी डॉ. नरेंद्र जाधव, साहू अखिलेश जैन, यांचा सत्कार होणार आहे. शिवाय ते सत्काराला उत्तरही देणार आहे. पुढे ठरावाचे वाचन, आभार प्रदर्शन आणि पसायदान होईल.